India China News : भारत-अमेरिकेत झालेल्या 'या' करारामुळे चीनची झोप उडाली

India China News
India China Newsesakal

India China News : भारत आणि अमेरिकेमध्ये झालेल्या सुरक्षा आणि तंत्रज्ञानविषयक झालेल्या करारानंतर चीनची झोप उडाली आहे. उभय देशांमधील संबंध सुधारण्यासाठी iCET हा उप्रकम आहे.

भारत आणि अमेरिका या कररांतर्गत प्रगत सुरक्षा तंत्रज्ञान आणि संगणकीय तंत्रज्ञानाला गती देण्यासाठी योजना तयार करणार आहे. यामध्ये जनरल इलेक्ट्रिक कंपनी जेट इंजनचा समावेश आहे.

India China News
DA : सरकारी कर्मचाऱ्यांना होळी गिफ्ट! महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांनी होणार वाढ?

अमेरिका भारतासोबत हा करार चीन आणि रशिया या देशांना मदत करण्यासाठी करत असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात चीनच्या एका मुख्य वृत्तपत्राने म्हटलं आहे की, भारत आणि अमेरिका अशा जोडप्यासारखे आहेत, जे झोपतात एकत्र परंतु त्यांचे मनात दुसरंच काहीतरी सुरु असतं.

चिनी कम्युनिस्ट सरकारचं मुखपत्र म्हणून ओळखलं जाणारं ग्लोबल टाईम्सने एक लेख प्रकाशित केला आहे. त्यामध्ये म्हटलंय की, अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलविन यांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी भेट घेतली. त्यमध्ये iCET उपक्रमासोबतच अधिकृतरित्या दोन्ही देशांच्या रणनितीला गती देण्याविषयी निर्णय झाला आहे.

हेही वाचा: Chandrashekhar Rao : 'अबकी बार किसान सरकार' नांदेडमध्ये चंद्रशेखर राव यांची जाहीर सभा

वृत्तपत्रामध्ये पुढे म्हटलं आहे की, एक चिनी म्हण आहे- एकाच बेडवर वेगवेगळे स्वप्न. म्हणजे दोन व्यक्ती एकमेकांसोबत आहेत मात्र त्यांचे मनसुबे वेगळे आहेत. ही म्हण अमेरिका आणि भारत संबंधांवर चपखल असल्याचं त्यात म्हटलं आहे.

भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये झालेल्या संरक्षणविषयक आणि तंत्रज्ञानासंबंधी करारामुळे चीन सरकारची डोकेदुखी वाढल्याचं दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com