चुकीला माफी नाही; चीनने ‘अलिबाबा’ला ठोठावला तब्बल १८.२ अब्ज युआनचा दंड!

China_Jack_Ma
China_Jack_Ma

हाँगकाँग : तब्बल महिनाभराच्या चौकशीनंतर चीनमधील नियामक यंत्रणेने शनिवारी (ता.१०) ई-कॉमर्स क्षेत्रातील जॅक मा यांच्या 'अलिबाबा' या उद्योगसमूहाला मोठा धक्का देत तब्बल १८.२ अब्ज युआन (२.८ अब्ज डॉलरचा) दणदणीत दंड ठोठावला आहे. मागील वर्षी ख्रिसमसच्या काळामध्ये यासंदर्भात चौकशीला सुरुवात झाली होती. ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’ या दैनिकाने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन फॉर मार्केट रेग्युलेशनने (एसएएमआर) ही कारवाई केली आहे.

याआधी जगातील सर्वांत मोठी मोबाईल चिपची उत्पादक कंपनी असणाऱ्या ‘क्वालकॉम’लाही २०१५ मध्ये चीन सरकारने ६.१ अब्ज युआनचा दंड ठोठावला होता. अलिबाबाला ठोठावण्यात आलेला दंड हा तब्बल दुप्पट आहे. अलिबाबाला ठोठावण्यात आलेल्या दंडाची रक्कम ही तिच्या २०१९ मधील एकूण देशांतर्गत महसुलाच्या चार टक्के म्हणजे ४५५.७१ अब्ज युआन एवढी असल्याचे नियामक व्यवस्थेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे अलिबाबाने देखील या दंडाचा स्वीकार केला असून तो सरकार दरबारी भरण्याची तयारी दर्शविली आहे.

अलिबाबाचे निवेदन
समाजाची सेवा करण्याच्या जबाबदारीला आम्ही बांधील आहोत. अलिबाबा उद्योगसमूह कायद्याच्या चौकटीमध्येच काम करेल, विविध प्रकारच्या नावीन्यपूर्ण संशोधनाच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीला चालना देण्याचे काम भविष्यामध्येही सुरूच राहील, असे अलिबाबाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

कंपनीवरील ठपका
या चौकशीमध्ये नियामक यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी अलिबाबावर व्यापारपेठेवरील आपल्या प्रभुत्वाचा गैरफायदा घेतल्याचा ठपका ठेवला आहे. अलिबाबाने आपल्या प्रभावाचा वापर करून अनेक व्यापाऱ्यांना स्वतःची बाजू घ्यायला भाग पाडले. यामुळे व्यापारी आणि ग्राहकांच्या हक्कांचा भंग झाल्याचे नियामक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान या कारवाईमुळे अलिबाबाच्या चीनमधील व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

- जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com