esakal | चीन आमचा सर्वात महत्त्वाचा सहकारी - तालिबान
sakal

बोलून बातमी शोधा

taliban

चीन आमचा सर्वात महत्त्वाचा सहकारी - तालिबान

sakal_logo
By
दीनानाथ परब

काबुल: अफगाणिस्तानवर (Afganistan) वर्चस्व मिळवणारं तालिबान लवकरच तिथे आपली सत्ता स्थापन करेल. आपल्या राजवटीला जगाकडून मान्यता मिळावी, यासाठी सध्या तालिबानकडून (Taliban) प्रयत्न सुरु आहेत. सध्याच्या घडीला तालिबानला चीनवर (china) जास्त विश्वास वाटत आहे. चीन आपला महत्त्वाचा सहकारी असल्याचे तालिबानने म्हटलं आहे. युद्धामध्ये (war) होरपळलेल्या अफगाणिस्तानला नव्याने उभं करण्यासाठी चीन मदत करेल, अशी तालिबानला अपेक्षा आहे.

त्या बदल्यात चीनचा डोळा अफगाणिस्तानातल्या नैसर्गिक साधन संपत्तीवर आहे. तालिबान राज येणार स्पष्ट झाल्यापासून अफगाणिस्तानची आर्थिक स्थिती बिकट होत चालली आहे. बँकांबाहेर लोकांच्या रांगा लागल्या आहेत. तिथल्या गरीब जनतेला दोन वेळचे जेवणे मिळणे सुद्धा मुश्किल होऊ शकते. तालिबानने चीनच्या वन बेल्ट, वन रोड योजनेचेही समर्थन केले आहे.

हेही वाचा: Video: रोहितने हवेत उडी मारून टिपलेला भन्नाट झेल एकदा पाहाच

या योजनेतंर्गत चीनला स्वत:ला अफ्रिका, आशिया आणि युरोप खंडाबरोबर बंदर, रेल्वे, रस्ते आणि इंडस्ट्रीयल पार्कने जोडून घ्यायचे आहे. तालिबानचा प्रवक्ता झबीहुल्लाह मुजाहीदने चीनच्या वन बेल्ट, वन रोड योजनेचे समर्थन करत असल्याची माहिती दिली. "चीन आमचा महत्त्वाचा सहकारी आहे. आमच्यासाठी ही मोठी संधी आहे. कारण चीन आमच्या देशात गुंतवणूक करुन, देशाची पूनर्उभारणी करण्यासाठी तयार आहे" इटालियन वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत झबीहुल्लाह मुजाहीदने हे वक्तव्य केल्याचे जिओ न्यूजने म्हटले आहे. अफगाणिस्तानवर तालिबानने नियंत्रण मिळल्यापासून चीनने त्यांचे समर्थन चालवले आहे. चीन-पाकिस्तानचे तालिबानला आधीपासूनच समर्थन आहे. रशियाने सुद्धा तालिबानला अनुकूल भूमिका घेतली आहे.

loading image
go to top