esakal | Video: रोहितने हवेत उडी मारून टिपलेला भन्नाट झेल एकदा पाहाच
sakal

बोलून बातमी शोधा

Video: रोहितने हवेत उडी मारून टिपलेला भन्नाट झेल एकदा पाहाच

Video: रोहितने हवेत उडी मारून टिपलेला भन्नाट झेल एकदा पाहाच

sakal_logo
By
विराज भागवत

चेंडू रोहितच्या दिशेने येतोय हे पाहताच रोहित हवेत झेपावला अन्...

Ind vs Eng 4th Test: भारतीय संघाचा (Team India) पहिला डाव १९१ धावांवर आटोपला. त्यानंतर चौथ्या कसोटीच्या (4th Test) पहिल्या दिवशी इंग्लंडनेदेखील (England) ५३ धावांच्या मोबदल्यात ३ गडी गमावले. इंग्लंडचा भरवशाचा फलंदाज जो रूट (Joe Root) बाद झाल्यामुळे त्याच्या जागी नाईट वॉचमन क्रेग ओव्हरटनला फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते. त्याने पहिल्या दिवसाच्या खेळ संपेपर्यंत तग धरला. पण दुसऱ्या दिवशी सुरूवातीलाच तो झेलबाद झाला. त्यानंतर लगेचच डेव्हिड मलानही झेलबाद झाला. रोहितने त्याचा टिपलेला झेल चर्चेचा विषय ठरला.

हेही वाचा: Video: विराटची तारेवरची कसरत.. स्लिपमध्ये घेतला अफलातून झेल

रोहित शर्मा स्लिपमध्ये उभा होता. डेव्हिड मलान चांगल्या लयीत होता. गेल्या सामन्यातील अर्धशतकवीर असलेला मलान उमेश यादवला सावधरितीने खेळत होता. त्यात नेमका एक चेंडू थोडासा स्विंग झाला. चेंडू बॅटला लागला आणि स्लिपच्या दिशेने गेला. त्यावेळी अत्यंत चपळाईन रोहितने हवेत झेप घेतली आणि भन्नाट कॅच पकडला.

पाहा व्हिडीओ-

डेव्हिड मलान बाद झाल्यानंतर मात्र ओली पोप आणि जॉनी बेअरस्टो या दोघांनी इंग्लंडचा डाव सांभाळला. ६२ धावांवर असताना इंग्लंडचे ५ बळी बाद झाले होते. पण पोप-बेअरस्टो जोडीने ८९ धावांची भागीदारी केली. या दोघांच्या फलंदाजीमुळेच इंग्लंडचे फॉलोऑनचे संकट टळले. ओली पोपने त्यानंतर दमदार खेळी करत अर्धशतकही ठोकला.

loading image
go to top