डोकलाममधील बांधकामाचे चीनकडून समर्थन

पीटीआय
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

भारताबरोबर पुन्हा एकदा डोकलाम वाद उकरुन काढण्याची चीन तयारी करत असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे

बीजिंग - डोकलाम भागात केलेल्या बांधकामाचे चीन सरकारने आज समर्थन केले. चीनच्या या भागातील नागरिकांचे आणि सैनिकांचे जीवनमान उंचावण्यासाठीच हे केल्याचे त्यांनी सांगितले.

डोकलाममधील वादग्रस्त भागापासून जवळच चीनी सैनिक मोठे लष्करी संकुल बांधत असून रस्तेही बांधले जात आहेत, असा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला होता. या अहवालामध्ये उपग्रहांद्वारे घेतलेल्या छायाचित्रांचाही समावेश होता. येथे लष्करी संकुल उभारले जात असल्याचे या छायाचित्रांमधून स्पष्ट दिसत आहे. ही छायाचित्रे खरी असल्याचे सांगण्यास चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने टाळाटाळ केली. मात्र, हा आमचाच भाग असल्याने येथील नागरिकांचे आणि सैनिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी बांधकाम करण्याचा आम्हाला अधिकार असल्याचे मंत्रालयाने सांगितले.

भारताबरोबर पुन्हा एकदा डोकलाम वाद उकरुन काढण्याची चीन तयारी करत असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China justifies infrastructure building in Doklam