esakal | चीनमध्ये तीन मांजरांना कोरोनाची लागण; लागलीच केलं ठार
sakal

बोलून बातमी शोधा

चीनमध्ये तीन मांजरांना कोरोनाची लागण; लागलीच केलं ठार

चीनमध्ये तीन मांजरांना कोरोनाची लागण; लागलीच केलं ठार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

उत्तर चीनच्या हार्बिन शहरामध्ये तीन घरगुती मांजरांना कोरोना झाल्याची घटना घडली आहे. कोरोना संक्रमित झाल्यानंतर या तीन मांजरांना ठार मारण्यात आलं आहे. बीजिंग न्यूज ऑनलाईन मीडियाच्या वृत्तांकनानुसार, हार्बिन शहरातील अधिकाऱ्यांनी म्हटलंय की, या तीन मांजरांना यासाठी मारलं गेलंय कारण कोरोना संक्रमणाचा उपचार प्राण्यांसाठी उपलब्ध नाहीये. या मांजरी आपल्या मालकासाठी तसेच आपर्टमेंटमध्ये राहणाऱ्या इतरांसाठी धोका बनल्या होत्या. या मांजरांचा मालक देखील 21 सप्टेंबर रोजी कोरोना पॉझिटीव्ह आल्याची माहिती आहे. यानंतरच त्याने आपल्या तिन्ही मांजरांना खायला देऊन घराबाहेर सोडून दिलं.

हेही वाचा: जपानला मिळणार नवे पंतप्रधान, LDP च्या नेतेपदी फुमिओ किशिदा यांची निवड

या दरम्यान एका सामाजिक कार्यकर्त्याने त्या तीन मांजरांची कोरोना टेस्ट केली, ज्यामध्ये त्या पॉझिटीव्ह आढळून आल्या. त्यानंतर संभाव्य धोका लक्षात घेता त्यांना ठार करण्यात आलं. चीनमध्ये पाळीव प्राण्यांबाबत क्रेझ खूप जास्त आहे.

संशोधकांच्या अभ्यासामधून ही बाब स्पष्ट झाली होती की, 2019 च्या अखेरिस चीनच्या वुहान शहरामध्ये कोरोना व्हायरस वटवाघळाच्या माध्यमातून माणसांमध्ये पसरला होता. चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या नियंत्रणासाठी मांजरांची हत्या करणं क्रूर उदाहरण आहे. मात्र, त्याशिवाय पर्याय नसल्याचं तिथल्या तज्ज्ञांनी म्हटलंय. मात्र, अन्य देशांच्या तुलनेत चीनमधील कोरोना संक्रमण खूप मोठ्या प्रमाणात आटोक्यात आलं आहे. संक्रमणाला आटोक्यात आणण्यासाठी चीन सरकारने लॉकडाऊन, मास्क बंधनकारक तसेच मोठ्या संख्येने टेस्टींग आणि लसीकरणाचा मार्ग निवडला आहे. त्यामुळे देशात कोरोनाचं संकट मोठ्या प्रमाणावर कमी झालं आहे.

हेही वाचा: ब्ला.. ब्ला.. ब्ला..; हवामान बदलावरून जगातील नेत्यांवर ग्रेटाचा संताप

चीनमधील माध्यमांच्या दाव्यानुसार, बुधवारी कोरोना संक्रमणाचे फक्त 11 केसेस सापडले आहेत. सध्या चीनमध्ये फक्त 949 कोरोनाचे ऍक्टीव्ह रुग्ण आहेत चीनमधील एकूण संक्रमितांची संख्या ही 96,106 आहे तसेच कोरोनामुळे आतापर्यंत चीनमध्ये 4,636 लोकांचा मृत्यू झाला आहे.

loading image
go to top