esakal | जपानला मिळणार नवीन पंतप्रधान, फुमिओ किशिदा यांची LDP च्या नेतेपदी निवड
sakal

बोलून बातमी शोधा

जपानला मिळणार नवे पंतप्रधान, LDP च्या नेतेपदी फुमिओ किशिदा यांची निवड

सध्याचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी एका वर्षाच्या आताच लिबरल डेमोक्रेटिक पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

जपानला मिळणार नवे पंतप्रधान, LDP च्या नेतेपदी फुमिओ किशिदा यांची निवड

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जपानच्या सत्ताधारी पक्षाने बुधवारी त्यांच्या नव्या पक्षनेत्याची निवड केली आहे. फुमिओ किशिदा यांची निवड झाली असून आता ते जपानचे पुढचे पंतप्रधान असणार आहेत. सत्ताधारी पक्षाची निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या नेत्याकडे पंतप्रधानपद सोपवले जाते. आगामी निवडणुकीच्या आधी पुढच्या पंतप्रधानांच्या नावाची घोषणा केली जाईल.

जपानमध्ये संसदीय निवडणुकीपेश्रा लिबरल डेमोक्रेटिक पक्षाच्या नेता निवडीची सर्वाधिक चर्चा होते. कारण एलडीपी नेत्याची निवड म्हणजे त्याची पंतप्रधानपदासाठी नियुक्ती नक्की मानली जाते. पुढच्या महिन्यात जपानमध्ये संसदीय निवडणूक होणार आहे.

हेही वाचा: 'मोदी जगाची शेवटची आशा', आम्ही छापलं नाही - न्यूयॉर्क टाइम्स

सध्याचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी एका वर्षाच्या आताच लिबरल डेमोक्रेटिक पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. २९ सप्टेंबरनंतर ते पक्षाचे नेते म्हणून काम पाहणार नाहीत. फुमिओ किशिदा यांची नवा नेता म्हणून निवड झाली असून आता ते पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. एलडीपीकडे संसदेत बहुमत आहे मात्र चार उमेदवारांमुळे राजकीय अस्थिरता देशात आहे.

loading image
go to top