
बाटा ही चप्पल आणि बुट बनवणारी एक सुप्रसिद्ध कंपनी आहे.
नवी दिल्ली : जगभरात अनेक भारतीय लोक आपल्या कार्यकर्तृत्वाने मोठ्या पदावर गेले आहेत. जगात ठिकठिकाणी भारतीयांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्याचप्रमाणे आता बाटा या सुप्रसिद्ध चप्पल कंपनीच्या सीईओ पदी आता एक भारतीय व्यक्ती बसली आहे. बाटा ही चप्पल आणि बुट बनवणारी एक सुप्रसिद्ध कंपनी आहे. आतापर्यंत प्रथमच या कंपनीचे नेतृत्व एका भारतीयाच्या हाती सोपवलं गेलं आहे. बाटाच्या आंतरराष्ट्रीय सीईओ पदी संदीप कटारिया यांची निवड करण्यात आली आहे.
हेही वाचा - रुग्णाच्या नाकावाटे थेट मेंदूत घुसतो कोरोना; नवे संशोधन प्रसिद्ध
ते आधी बाटा इंडियाचे सीईओ होते. आणि आता त्यांना बढती मिळून बाटाच्या आंतरराष्ट्रीय सीईओ पदी नेमणूक करण्यात आली आहे. बाटाच्या आजवरच्या 126 वर्षांच्या इतिहासात प्रथमच एक भारतीय व्यक्ती इतक्या मोठ्या पदावर बसणार आहे. आधीचे सीईओ एलेक्सिस नसार्ड यांच्या जागी संदिप कटारिया यांची ही निवड करण्यात आली आहे. जगात अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांच्या प्रमुखपदी भारतीय व्यक्ती काम पाहते. सत्या नाडेला, सुंदर पिचाई यांच्या बरोबरच आता संदिप कटारिया हे या प्रकारच्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीचे सीईओ ठरले आहेत. सत्या नाडेला हे मायक्रोसॉफ्टचे तर सुंदर पिचाई हे अल्फाबेटचे सीईओ आहेत. कटारिया यांनी 17 वर्षांहून अधिक काळ युनिलिव्हरमध्ये काम केलं आहे.
हेही वाचा - आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना कॅनडाचे PM ट्रुडो यांचं समर्थन; म्हणाले चिंताजनक परिस्थिती
नसार्ड हे बाटाचे पाच वर्षे सीईओ होते. 2017 साली संदिप कटारिया हे बाटाचे सीईओ म्हणून रुजू झाले होते. बाटाचे स्वित्झर्लंडमध्ये मुख्यालय आहे. कटारिया यांच्या नेतृत्वाखाली बाटाने भारतामध्ये दुप्पट नफा कमावला होता. 2019-20 मध्ये बाटा इंडियाचा महसूल 3.053 कोटी रुपये होते तर नेट प्रॉफिट 327 कोटी रुपये होते.