बापरे! चीनमध्ये आता नवा व्हायरस; एकाच्या मृत्यूने खळबळ

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 मार्च 2020

चीनमधीन युनान प्रांतात हंता व्हायरसमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. बसमधून शाडोंग प्रांतात जात असताना त्या व्यक्तीचा बसमध्येच मृत्यू झाला आहे. हंता व्हायरसचा तो पॉझिटिव्ह रुग्ण होता. त्याच्यासोबत बसमधून प्रवास करणाऱ्या अन्य 32 जणांचीही चाचणी करण्यात येणार आहे. 

पेइचिंग : चीनमधील वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असतानाच आता चीनमध्ये एका नव्या व्हायरसमुळे एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियामध्ये या व्हायरसवरून विविध प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.

चीनमधीन युनान प्रांतात हंता व्हायरसमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. बसमधून शाडोंग प्रांतात जात असताना त्या व्यक्तीचा बसमध्येच मृत्यू झाला आहे. हंता व्हायरसचा तो पॉझिटिव्ह रुग्ण होता. त्याच्यासोबत बसमधून प्रवास करणाऱ्या अन्य 32 जणांचीही चाचणी करण्यात येणार आहे. 

चीनमधील सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने हे वृत्त दिल्यानंतर खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिा येत असून, कोरोनाप्रमाणे हा व्हायरसही जागतिक रोग बनू नये अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे. एकाने तर चीन जनावरांना खाणे जोपर्यंत बंद करत नाही तोपर्यंत असे व्हायरस निर्माण होतच राहणार असे म्हटले आहे. 

काय आहे हंता व्हायरस?
हंता व्हायरस हा कोरोनाप्रमाणे धोकादायक नाही, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. हा व्हायरस हवेतून पसरत नाही. पण, उंदीर किंवा वटवागुळाच्या संपर्कात आल्यानंतर तो नागरिकांमध्ये पसरतो. निरोगी व्यक्तीही या व्हायरसचा शिकार होऊ शकतो. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला याची लागण होत नाही. ताप, डोकेदुखी, अंगदुखी, पोटात दुखणे, उलटी, जुलाब अशी या रोगाची लक्षणे आहेत. उपचारात उशीर झाल्यास मनुष्याचा फुफ्फुसामध्ये पाणी जमा होण्यास सुरवात होते आणि त्याला श्वास घेण्यास त्रास होतो.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China Man Death By Hantavirus in Hunan province