Covid-19 संदर्भातील सत्य लपवण्यासाठी चीनने ट्रोलर्संसाठी मोजले पैसे

 china manipulated
china manipulated

वॉशिंगटन: सध्याच्या घडीला आपण एखाद्या मुद्यावरुन सोशल मिडियावर ट्रोलिंगचा प्रकार अनुभवतो. अनेकदा लोकप्रिय व्यक्ती, संस्था एखाद्या भुमिकेमुळे ट्रोल होतात. वेगाने प्रसार होणाऱ्या माध्यमात पैसे देऊनही एखाद्याला टार्गेट करण्याचा प्रकारही पाहायला मिळतो. असाच काहीसा प्रकार चीनने कोरोना विषयी केल्याचे समोर येत आहे. ट्रोलर्संना पैसे देऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोनासंदर्भात दिशाभूल करण्याचे काम चीनने केल्याचे समोर येत आहे. 

एका अहवालातून करण्यात आलेल्या दाव्यानुसार, चीन अधिकाऱ्यांनी स्थानिक तसेच बाहेरच्या काहींना ट्रोल्स करण्यासाठी पैसे मोजले होते. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर चीनला अडचणीत आणणाऱ्या गोष्टी दाबून टाकण्यासाठी या ट्रोलर्संचा वापर करण्यात आला होता.  New York Times आणि  ProPublica ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, चिनी अधिकाऱ्यांनी सरकारच्या बाजूच्या बातम्या सोशल मीडियावर पसरवण्यासाठी ट्रोल्सना पैसे दिले होते. एवढेच नाही तर विरोधात व्यक्त होणारा आवाज दाबण्यासाठी सैन्याचा वापर केला होता.  

संबंधित अधिकाऱ्यांनी कोविड-19 संदर्भातील इशारा देणारे डॉक्टर ली वेनलियांगच्या मृत्यूच्या बातमीचे पुश नोटिफिसेशनही देऊ दिले नव्हते. ही घटना घडल्यानंतर डॉक्टर वेनलियांग सोशल मीडियावर ट्रेंडिगमध्ये येणार नाहीत, याची खबरदारी चीनने घेतली होती. हळूहळू ट्रेंडिंगमध्ये येणारे नाव नाहीसे करा, असे आदेश टोलर्संना देण्यात आले होते. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

न्यूज वेबसाईट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी विशेष आदेश जारी करण्यात आले होते. यात पुश नोटिफिकेशन न पाठवणे, अफवा न पसवरणे, ऑनलाईन डिस्कशनवर नियंत्रण ठेवणे, हॅशटॅक तयार न करणे, तयार होणाऱ्या हॅशटॅगला ट्रेंडिंगमधून हटवणे, चीनसाठी डोकेदुखी ठरु शकतील, अशा मुद्यावर नियंत्रण ठेवणे अशा खास सूचना देण्यात आल्या होत्या.  

चीनमधील वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने जगाची गणित बिघडवली आहेत. सुरुवातीपासून चीनवर यासंदर्भात माहिती लपवल्याचे आरोप झाले आहेत. अमेरिका आणि चीन यांच्यातील तणावर अधिक वाढल्याचेही पाहायला मिळाले. त्यानंतर आता सोशल मीडियाच्या माध्यमातून चीनने दिशाभूल केल्याचे समोर येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com