हाँगकाँगमधील माध्यमांच्या नाकेबंदीची चीनची चाल

वृत्तसंस्था
Friday, 25 September 2020

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेनबीन यांनी याविषयी दैनंदिन पत्रकार परिषदेत मात्र मुत्सद्देगिरीचे भाष्य केले. प्रसार माध्यमांचे व्यवस्थापन भक्कम करण्याच्या हाँगकाँग सरकारने आखलेल्या योजनेस आमचा पाठिंबा आहे, असे ते म्हणाले. 

बीजिंग - हाँगकाँगमधील प्रसार माध्यमांची नाकेबंदी करण्यासाठी चीनने आगळी चाल केली आहे. प्रसार माध्यम प्रतिनिधींच्या व्याख्येची व्याप्ती मर्यादित करण्याचा निर्णय  हाँगकाँग पोलिसांनी घेतला आहे. त्यास पाठिंबा असल्याचे चीनने जाहीर केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेनबीन यांनी याविषयी दैनंदिन पत्रकार परिषदेत मात्र मुत्सद्देगिरीचे भाष्य केले. प्रसार माध्यमांचे व्यवस्थापन भक्कम करण्याच्या हाँगकाँग सरकारने आखलेल्या योजनेस आमचा पाठिंबा आहे, असे ते म्हणाले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नव्या नियमांनुसार पत्रकार आणि वृत्तपत्र छायाचित्रकार अशा दोन संघटनांनी जारी केलेल्या प्रेस पासेसची मान्यता पोलिसांनी वगळून टाकली आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China move to block media in Hong Kong