तीबेट भोवती अभेद्य भींत उभारणार; शी जिनपिंग यांचे सूतोवाच

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 30 August 2020

चीनने १९५० मध्ये तिबेट आपल्या ताब्यात घेतले होते.

बिजिंग- तिबेटमध्ये Tibet स्थिरता टिकवण्यासाठी सर्व बाजूंनी अभेद्य अशी भींत impregnable fortress बनवायला हवी, असं वक्तव्य चीनचे सर्वेसर्वा शी जिनपिंग Xi Jinping यांनी केलं आहे. देशाची एकता टिकवण्यासाठी हे आवश्यक आहे. शिवाय तिबेटमधील लोकांना कम्युनिस्ट पक्षाच्या विचारसरणीचे शिक्षण द्यायला हवे, जेणेकरुन विभाजनवादी शक्तींना आळा बसेल, असंही ते म्हणाले आहेत. जिनपिंग पक्षाच्या एका उच्चस्तरीय बैठकीत बोलत होते. राज्य माध्यमांनी शनिवारी याबाबतची माहिती दिली आहे.

स्वीडनमध्ये मुस्लीमविरोधी गटाने कुरानला लावली आग; दंगल उसळली

चीनने १९५० मध्ये तिबेट आपल्या ताब्यात घेतले होते. तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी तिबेट चीनचा भाग असण्याला सर्वात आधी मान्यता दिली होती. चीन तिबेटच्या सामिलीकरणाला शांतीपूर्ण मुक्ती असा उल्लेख करते, पण सध्या हद्दपारीत असलेले नेते दलाई लामा dalai lama यांनी चीनवर टीका केली आहे. चीनने तिबेटवर आक्रमण केले असून तो 'सांस्कृतिक नरसंहार' होता, असं ते म्हणाले आहेत. 

देशाने आतापर्यंत घेतलेली मेहनत लक्षणीय आहे. पण देशाची समृद्धी आणि प्रदेशातील एकता अधिक मजबूत करण्यासाठी अधिक प्रयत्न करायला हवेत. तिबेटमधील शाळांमध्ये राजकीय आणि वैचारिक शिक्षण देणे महत्वाचे आहे. शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये चीन प्रेमाचे बी पेरायला हवे, असं शी जीनपींग म्हणाले आहेत.

देशात कोरोनाचा कहर; राज्यात नव्या रुग्णांच्या आकड्याने गाठला उच्चांक

संयुक्त, समृद्ध, सुसंस्कृत, आधुनिक आणि समाजवादी तिबेट बनवण्यासाठी प्रयत्न करुन चायना कम्युनिस्ट पक्षाचे पाळेमुळे घट्ट रोवायली हवीत. शिवाय आपल्या वांशिक गटाला एकत्र करण्याची आज गरज आहे. तिबेटच्या बुद्धीझमने समाजवाद आणि चाईनीज परिस्थिती स्वीकारायला हवी, असं जीनपिंग म्हणाले होते. २०१५ मध्ये शि जिनपिंग यांनी देशातील पाच प्रमुख धर्म कॅथोलिझम, प्रोटेस्टिझंम, इस्लाम, बुद्धीझम आणि दओझम यांचे चिनीकरण करण्याचे वक्तव्य केलं होतं. चीनमध्ये इस्लाम धर्माचे चिनीकरण (चिनी कम्युनिस्ट पक्षाशी बांधिल) करण्याचे काम वेगाने सुरु आहे.

दरम्यान, तिबेटवरुन संयुक्त राष्ट्राने चीनवर अनेकदा टीका केली आहे. तिबेटमध्ये मानवी अधिकारांचे उल्लंघन होत आहे, असं  संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. अमेरिकेनेही याच मुद्द्यावरुन चीनच्या अनेक अधिकाऱ्यांच्या व्हिसावर निर्बंध आणले होते. याला प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकेच्या अधिकाऱ्यांवर व्हिसा बंदी लागू केली आहे. 

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China Must Build Impregnable Fort For Stability In Tibet said Xi Jinping