Lok Sabha election 2024 Results : भारतातल्या लोकसभा निकालावर चीनची प्रतिक्रिया; ''जर मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर...''

ग्लोबल टाईम्सच्या लेखामध्ये पंतप्रधानांनी अमेरिकेत दिलेल्या मुलाखतीचा संदर्भ दिला आहे. त्यात मोदींनी भारताचे चीनसोबत चांगले संबंध आहेत, असं म्हटलं होतं. परंतु दोन्ही देशांमध्ये सीमेवरुन होत असलेल्या संघर्षावर उपाय शोधावा लागेल, असं विधान केलं होतं. त्याचा हवाला लेखामध्ये देण्यात आलेला आहे.
Lok sabha election 2024 Results
Lok sabha election 2024 Resultsesakal

China on Lok Sabha election results : मंगळवारी लोकसभा निवडणुकीचे निकाल येत आहेत. त्यापूर्वीच शनिवारी आलेल्या एक्झिट पोलमध्ये देशात पुन्हा एकदा भाजपला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. काही एक्झिट पोलमधून तर एनडीएला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा कौल मिळाल्याचं दिसत आहे.

भारतातल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या संबंधाने चीनची प्रतिक्रिया पुढे आली आहे. ग्लोबल टाईम्स हे सरकारचं अधिकृत वृत्तपत्र आहे, त्यामध्ये एक लेख प्रकाशित झाला आहे. जगभरात या लेखाची चर्चा होत आहे.

Lok sabha election 2024 Results
Eknath Shinde: शहाजी बापू पाटील ब्रिच कॅण्डी रुग्णालयात, CM एकनाथ शिंदेंनी घेतली भेट

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या संभाव्य विजयावर चीन खूश झाल्याचं चित्र आहे. मुखपत्रात म्हटलंय की, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर दोन्ही देशांमधले संबंध सुधारतील.

लेखामध्ये पुढे म्हटलंय की, मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सीमांवर होणाऱ्या चकमकी कमी होतील आणि भारताच्या परराष्ट्र धोरणात आणखी सुधारणा होईल.

Lok sabha election 2024 Results
Raveena Tandon : कंगनाने दिली रवीनाची साथ ; व्हायरल झालेल्या व्हिडिओवर म्हणाली "हे खूप धोकादायक..."

ग्लोबल टाईम्सच्या लेखामध्ये पंतप्रधानांनी अमेरिकेत दिलेल्या मुलाखतीचा संदर्भ दिला आहे. त्यात मोदींनी भारताचे चीनसोबत चांगले संबंध आहेत, असं म्हटलं होतं. परंतु दोन्ही देशांमध्ये सीमेवरुन होत असलेल्या संघर्षावर उपाय शोधावा लागेल, असं विधान केलं होतं. त्याचा हवाला लेखामध्ये देण्यात आलेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com