Breaking : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग रुग्णालयात दाखल

वृत्तसंस्था
Sunday, 10 May 2020

डॉ. सिंग यांनी २००४ ते २०१४ या कालावधीत भारताचे पंतप्रधानपद भूषविले आहे.

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्लीतील एम्स या हॉस्पिटलमध्ये त्यांना अॅडमिट करण्यात आल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

८७ वर्षीय डॉ. सिंग गेल्या अनेक वर्षांपासून हृदयविकाराच्या आजाराने त्रस्त आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव पदरी पडल्याने त्यांना पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावे लागले. मात्र, सध्या ते राज्यसभेत खासदार म्हणून काम पाहत आहेत. संसदीय कामकाजात सर्वाधिक सहभाग नोंदविणाऱ्या सदस्यांपैकी ते एक आहेत. 

- बराक ओबामांनी ट्रम्प यांच्यावर डागली तोफ; म्हणाले...

डॉ. सिंग यांनी २००४ ते २०१४ या कालावधीत भारताचे पंतप्रधानपद भूषविले आहे. १९९१ मध्ये ते काँग्रसशी जोडले गेले. त्यानंतर नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये त्यांनी अर्थमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. १९९१ मध्ये देशाची ढासळत चाललेली अर्थव्यवस्था सावरण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. 

- इथंही शरद पवारच ठरले किंगमेकर!

1998 ते 2004 दरम्यान सिंग यांनी राज्यसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले आहे. पंतप्रधानपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर सिंह यांनी अर्थविषयक संसदीय समित्यांचे नेतृत्व केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय घेतला आणि तो अंमलात आणला. मोदींच्या या निर्णयाला विरोध करणाऱ्या देशातील प्रमुख नेत्यांपैकी डॉ. सिंग हे एक आहेत.

आणखी वाचा - पुणे पोलिस लई हुशार!

रविवारी रात्री उशिरा छातीत दुखू लागल्याने डॉ. सिंग यांना लगेच एम्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे त्यांना कार्डिओथोरॅसिक वॉर्डमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former prime minister dr manmohan singh admitted delhi aiims