चीन लडाखमध्ये मोठ्या संघर्षाची करतोय तयारी; सॅटेलाईट फोटोंमधून उघड

वृत्तसंस्था
Thursday, 30 July 2020

चीनने लडाखच्या काही भागातून माघार घेतली आहे. मात्र, मोठ्या संघर्षासाठी चीन एलसीपासून काही दूर असणाऱ्या अक्साई चीन भागात मोठी सैन्य तयारी करत आहे.

नवी दिल्ली- पूर्व लडाखमध्ये भारताची जमीन हडप करण्याचा प्रयत्न करणारा चीन पैंगोग त्यो झीलच्या फिंगर 4 ते 8 या भागातून मागे हटण्यास तयार नाही. चीनने लडाखच्या काही भागातून माघार घेतली आहे. मात्र, मोठ्या संघर्षासाठी चीन एलसीपासून काही दूर असणाऱ्या अक्साई चीन भागात मोठी सैन्य तयारी करत आहे. चीन आपल्या सैतुला सैन्य ठिकाणाला आधुनिक बनवत आहे. तसेच येथे घातक शस्त्र तैनात करत असल्याचं उपग्रह छायाचित्रांमधून स्पष्ट होत आहे.

1 ऑगस्ट पासून बदलणार 10 नियम, तुम्हाला बसू शकतो आर्थिक फटका
ओपन सोर्स इंटेलिजेंस एनालिस्ट Detresfa ने सीमा भागातील काही छायाचित्र प्रसिद्ध केली आहे. छायाचित्रांनुसार चीनने गेल्या दोन वर्षांपासून सैन्य छावणीला किल्ल्याचं रुप देणं सुरु केलं आहे. सैतुलामध्ये चीन जवानांना फार काळ थांबण्यासाठी आणि लडाखमध्ये त्यांच्या तैनातीसाठी प्रशिक्षण सुविधा जमवत आहे. चीनने नव्या छावण्या आणि हेलीपोर्ट तयार केले आहे. याशिवाय चीनने सैतुलामध्ये तोफा आणि अन्य घातक शस्त्र तैनात केले आहेत.

ड्रॅगनने भारताच्या सीमेला लागू असलेले 8 एअरबेस केले सक्रिय

चीनने भारताच्या सीमेला लागून असलेली 8 एअरबेस सक्रिय केले आहेत. येथून चीन आपल्या युद्ध हालचाली वाढवू शकतो. नुकतेच शिनजियांग प्रांतातील होटान हवाईतळावर तैनात चीन लढाऊ विमानांची छात्राचित्रे समोर आली होती. 

अवकाशयानाच्या केबिनचे दर्शन
अत्यंत उंच भागावर स्थित असल्याने चीन या भागात हवाई शक्तीमध्ये भारतापेक्षा कमकुवत आहे. भारतीय हवाईतळ या भागातून पूर्ण क्षमतेने चीनविरोधात कारवाई करु शकते. चीनने आपल्या हवाई तळावर शेनयांग जे-11 लढाऊ विमाने तैनात केली आहेत, ज्यांची रेंज 3530 किलोमीटरची आहे. या लढाऊ विमानांची अधिकतम वेग मर्यादा 2500 किमी प्रति तास आहे. सध्या चीनकडे एकूण 250 जे-11 विमाने आहेत. 

भारताने चीनच्या हालचालींची माहिती गोळा करणे सुरु केले आहे. भारताचे हेरगिरी उपग्रह EMISAT चीनने ताब्यात घेतलेल्या तिबेटवरुन गेले होते. यावेळी उपग्रहाने काही माहिती गोळा केल्याचं सांगितलं जात आहे. भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) उपग्रह EMISAT इंटेलिजेंस माहिती गोळा करत आहे. या उपग्रहावर ELINT म्हणजे इलेक्ट्रॉनिक इंटेलिजेंस सिस्टम 'कौटिल्य' लावण्यात आला आहे. याचे काम गुप्त माहिती गोळा करण्याचे आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उपग्रह नुकतेच अरुणाचल प्रदेश जवळच्या तिबेट भागातून गेले होते. इस्त्रोने बनवलेले EMISAT शत्रूच्या भागांमधील रेडिओ सिग्नल वाचण्याचे काम करते. त्यामुळे शत्रूंची योजना समजण्यास मदत होते.

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: china preparing for big war in ladakh satelite photo