China Corona Outbreak : आकडे लपविण्याच्या आरोपांमुळे चीन सरकारने घेतला निर्णय; पुढच्या महिन्यापासून... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

China Corona Outbreak

China Corona Outbreak : आकडे लपविण्याच्या आरोपांमुळे चीन सरकारने घेतला निर्णय; पुढच्या महिन्यापासून...

नवी दिल्लीः चीनमधील धक्कादायक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहेत. चीनमध्ये कोरोनाने हाहाःकार माजवल्याचं सांगितलं जात आहे. त्यातच काल राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन 'आपल्याला जीव वाचवले पाहिजेत' असं म्हटलं होतं.

चीन सरकार कोरोनाचे आकडे लपवित असल्याचा आरोप जगभरातून होतोय. त्यामुळे चीन सरकार पुढच्या महिन्यापासून कोरोनाचे आकडे जाहीर करणार आहे. प्रत्येक महिन्याला आकडे जाहीर करण्याचा निर्णय चीनने घेतला आहे.

हेही वाचाः जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

मीडिया रिपोर्टनुसार चिनी हॉस्पिटल्समध्ये बेड शिल्लक नाहीत, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालाय. एवढंच नाही तर सर्दी, खोकला आणि अंगदुखीचे मेडिसिनही सहज उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

हेही वाचा: Year Ender 2022 : श्रद्धाचे 35 तुकडे ते भट्टीत बापाला जाळले... 'या' 7 घटनांनी देश हादरला

त्यातच काल चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने देशांतर्गत हवाई प्रवास करणाऱ्यांना क्वारंटाईन करण्याचा नियम रद्द केला आहे. त्यावरुनही तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

दरम्यान, आज चीनमधल्या कोरोना महामारी हाताळणाऱ्या कमिटीने याबाबत दर महिन्याला कोरोना आकडेवारी जाहीर करण्याचा निर्णय घेतलाय. आकडे लपविण्याच्या होणाऱ्या आरोपांमुळे चीन असं करतंय का? असा प्रश्न उपस्थित होतोय. दुसरीकडे चीन सांगेल ते आकडे खरे असतील की खोटे? हीही मुद्दा आहेच.

टॅग्स :ChinaCoronaviruscovid19