करुन दाखवलं! चीनमध्ये एकही नवा कोरोना रुग्ण नाही 

China, COVID 19, coronavirus outbreak
China, COVID 19, coronavirus outbreak

बिजिंग: कोरोना महामारीने सर्व जगाला आपल्या कवेत घेतले आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून मृत्यू झालेल्यांची संख्याही वाढत आहे. अशात जेथे कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता त्या चीनमधून एक चांगली बातमी आली आहे. चीनमध्ये मागील 24 तासांत एकाही नव्या कोरोना बाधिताची नोंद झालेली नाही. डिसेंबरमध्ये जेव्हा पहिल्यांदा कोरोनाचा रुग्ण आढळला होता तेव्हापासून पहिल्यांदाच असं घडलं आहे. त्यामुळे चीन कोरोनाचा संसर्ग रोखण्यात बऱ्यापैकी यशस्वी झाल्याचं दिसत आहे.

covid-19 चा संसर्ग पहिल्यांदा चीनच्या वुहान शहरातून सुरु झाला होता. त्यानंतर संसर्गाने हळूहळू संपूर्ण जगात आपले हातपाय पसरवण्यास सुरुवात केली. आज जगात 52 लाखांपेक्षाही अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. सुरुवातीला चीनमध्ये कोरोना बाधितांची संख्या दुपटीने वाढत होती. मात्र, फेब्रुवारी-मार्चपासून चीनने कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. चीनने देशातील लॉकडाऊनही उठवला आहे. तसेच वुहान शहरातील प्रत्येक नागरिकांची कोरोना चाचणी घेतली जात आहे. त्यामुळे चीन कोरोना विरुद्धची लढाई जिंकण्याच्या मार्गावर आहे.  

चीन देशाची लोकसंख्या जवळजवळ 140 कोटी आहे. कोरोना उद्रेकाच्या काळात चीनमध्ये 4,634 लोकांनी आपला जीव गमावला आहे. मात्र, मृतांच्या संख्येबाबत अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. प्रचंड लोकसंख्या असलेला चीन कोरोनाग्रस्त आणि कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा कमी दाखवत आहे, अशी शंका अमेरिकेकडून घेतली गेली आहे. तसेच चीन आंतरराष्ट्रीय गटापासून माहिती लपवत आहे, असा आरोपही अमेरिकेकडून करण्यात आला आहे. 
चीनने अमेरिकेकडून होत असलेल्या आरोपांचे खंडन केले आहे. देशाने कोरोना व्हायरस संबंधाची माहिती वेळोवेळी जागतिक आरोग्य संघटनेला(WHO) दिली आहे. तसेच वेळोवेळी इतर देशांपर्यंत माहिती पोहोचवल्याचं चीनच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. तसेच covid-19 ला रोखण्यात चीनला यश मिळत आहे, असं चीनने म्हटलं आहे. 

दरम्यान, चीनने सुरुवातीच्या काळात कोरोना संबंधातील माहिती लपवल्याचा आरोप आहे. शिवाय ज्या डॉक्टरांनी कोरोना व्हायरसबाबत धोक्याचा इशाला दिला होता, अशांना चीनने गप्प केल्याचा आरोप आहे. मात्र, चीनने हे सर्व आरोप खोटे असल्याचं वेळोवेळी म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com