esakal | Coronavirus : जिथून सुरुवात झाली तिथे होतोय कोरोनाचा शेवट
sakal

बोलून बातमी शोधा

China reports two coronavirus cases for May 2

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून अमेरिकेसारख्या देशात तर कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. अशात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाला जिथून सुरुवात झाली त्या चीनमध्ये परिस्थिती हळूहळू सुधारत असल्याचे दिसत आहे.

Coronavirus : जिथून सुरुवात झाली तिथे होतोय कोरोनाचा शेवट

sakal_logo
By
वृत्तसंस्था

बीजिंग : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून अमेरिकेसारख्या देशात तर कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. अशात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाला जिथून सुरुवात झाली त्या चीनमध्ये परिस्थिती हळूहळू सुधारत असल्याचे दिसत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनमध्ये काल (ता. ०२) शनिवारी केवळ ०२ कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. परदेशातून येणाऱ्या लोकांवर बंधने घातल्यापासून चीनमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. चीनमधील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, चीनमध्ये आतापर्यंत ८२८७७ लोकांना कोरोनाची लागण झाली होती. यातील अधिकाधिक रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातू सुट्टीही देण्यात आली आहे.

जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा गोळीबार; दोन अधिकाऱ्यांसह तीन जवान शहीद

दरम्यान, अमेरिकेमध्ये कोरोनाने आतापर्यंत ६७ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे, तर गेल्या २४ तासात २९ हजार नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. चीनमध्ये मात्र काल (ता. ०२) शनिवारी एकाही कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तसेच गेल्या आठवड्यात केवळ एका कोरोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. चीनमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ४६३३ आहे. दरम्यान, चीन सरकारने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रवासवर बंधने घातली असून निर्बंध अजून उठविण्यात आलेले नाहीत.

loading image
go to top