esakal | जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा गोळीबार; दोन अधिकाऱ्यांसह तीन जवान शहीद
sakal

बोलून बातमी शोधा

Army Colonel Major among five martyred in encounter in J&K's Handwara; two terrorist killed

भारत-पाकिस्तान सीमेवर आज पुन्हा एकदा दहशतवाद्यांशी सुरक्षा रक्षकांची जोरदार चकमक झाली. या चकमकीत दोन लष्करी अधिकाऱ्यांसोबत तीन जवान शहीद झाले आहेत. तर, दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात करण्यात जवानांना यश आलं आहे.

जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा गोळीबार; दोन अधिकाऱ्यांसह तीन जवान शहीद

sakal_logo
By
वृत्तसंस्था

श्रीनगर : भारत-पाकिस्तान सीमेवर आज पुन्हा एकदा दहशतवाद्यांशी सुरक्षा रक्षकांची जोरदार चकमक झाली. या चकमकीत दोन लष्करी अधिकाऱ्यांसोबत तीन जवान शहीद झाले आहेत. तर, दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात करण्यात जवानांना यश आलं आहे. एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जम्मू-काश्मीरच्या हंदवाडा परिसरात शनिवारी रात्रीपासून सुरु असलेल्या चकमकीत भारतीय जवान शहीद झाले आहेत. शहीद झालेल्या जवानांमध्ये एक कमांडिंग ऑफिसर, मेजर आणि दोन जवानांचा समावेश आहे. तर एकजण स्थानिक पोलीस दलातील कर्मचारी होते.

लॉकडाऊनमुळे नुकसान झालेल्या बांधकाम व्यवसायिकांसाठी गडकरींचा सल्ला; म्हणाले...

शनिवारी रात्री २१ राष्ट्रीय रायफल्सचे जवान हंदवाडा येथील एका घरात शिरले. याठिकाणी दहशतवाद्यांनी काही नागरिकांना ओलीस ठेवले होते. त्यांना सोडवण्यासाठी चार भारतीय जवान आणि एक स्थानिक पोलीस आतमध्ये गेले होते. यावेळी त्यांचा इतरांशी संपर्क तुटला. यानंतर भारतीय जवान दहशतवाद्यांसोबत एकाच खोलीत अडकून पडल्याची माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली होती. यानंतर आज सकाळी हे चार जवान आणि एक पोलीस कर्मचारी शहीद झाल्याचे स्पष्ट झाले. हे सर्वजण घरात शिरल्यानंतर आधीपासूनच तिथे लपून बसलेल्या दहशतवादयांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. यामध्ये भारतीय जवान शहीद झाले. मात्र, घरात अडकून पडलेल्या नागरिकांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.