
चीन आणि भूतान यांच्यातील सीमेचा वाद १९५० च्या दशकापासून सुरू आहे. पण २०२० मध्ये चीनने भूतानच्या एका नवीन भागावर आपला दावा ठोकला. धक्कादायक बाब म्हणजे, ही जागा चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेटच्या सीमेला लागून नाही. हे क्षेत्र अरुणाचल प्रदेशमधील तवांग सीमेजवळ भूतानच्या पूर्वेकडील 'सकतेन्ग वाईल्ड लाईफ सेंचुरी' आहे. एका अहवालानुसार, २०२० मध्ये 'ग्लोबल इन्व्हिरॉनमेंट फॅसिलिटी'च्या बैठकीदरम्यान चीनने या भागावरही आपला दावा सांगितला. मात्र भूतानने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला होता.