India China: दलाई लामांना शुभेच्छा दिल्याने; चीन भारतावर नाराज
Mao Ning : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलाई लामांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर चीनने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. तिबेटविषयक चीनच्या संवेदनशीलतेचा भारताने आदर करावा, अशी मागणी चीनने केली आहे.
बीजिंग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा यांना ९० व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याने आणि त्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात भारतीय अधिकारी सहभागी झाल्याने चीनने भारताचा निषेध केला.