Taiwan News : तैवानच्या संरक्षण मंत्रालयाची वेबसाइट हॅक, सायबर सुरक्षा वाढवणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cyber attack

Taiwan News : तैवानच्या संरक्षण मंत्रालयाची वेबसाइट हॅक, सायबर सुरक्षा वाढवणार

अमेरिकेच्या महिला नेत्या नॅन्सी पेलोसी यांनी बुधवारी 3 ऑगस्ट रोजी तैवानचा दौरा पूर्ण केला आहे. त्यांच्या या दौऱ्यानंतर तातडीने चीनच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. या दौऱ्यानंतर चीनने तैवानवर अनेक आर्थिक निर्बंध लादले आहेत. दरम्यान, तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची वेबसाइट काही काळासाठी हॅक झाली होती. चीनच्या हॅकर्सने हे हॅकिंग केले असल्याचे समजचे असून यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

या पार्श्वभूमीवर सध्या तैवानच्या प्रदेशाची सायबर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला तैवानच्या अध्यक्षीय कार्यालयासह अनेक सरकारी वेबसाइट्सना सायबर हल्ल्याचा फटका बसला होता. आणखी तीन रशियाच्या हॅकर्सनी या वेबसाइट हॅक केल्याचं काही अधिकाऱ्यांचं मत आहे. त्यामुळे चीन आणखी सतर्क झाला असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा: shinde vs shiv sena Live: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच आज तरी सुटणार का?

नॅन्सी पेलेसी यांच्या तैवान भेटीपासून चीनची असुरक्षितता वाढली असल्याची चर्चा आहे. तैवानच्या सीमेवर ड्रॅगनची घातक शस्त्रांनी धमाकूळ घातला आहे. यादरम्यान, तैवान आणि अमेरिकेवर निशाणा साधत चीनचे परराष्ट्र मंत्री म्हणाले, बीजिंगला त्रास देणाऱ्यांसाठी हे चांगले नाही.

चीनच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी इशारा दिला आहे. जो कोणी बीजिंगला त्रास देईल त्याला शिक्षा होईल. नॅन्सी पेलोसीच्या तैवान दौऱ्यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितल आहे की, लोकशाहीच्या नावाखाली अमेरिका चीनच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करत आहे. नॅन्सी पेलोसी यांची भेट तैवानमधील लोकशाहीबद्दल नसून ती चीनच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा मुद्दा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा: ठाकरे सरकारने निलंबित केलेल्या डीसीपी पराग मणेरेंची पुन्हा नियुक्ती; शिंदे सरकारचा निर्णय

Web Title: China Taiwan Conflict Taiwan Defence Ministry Hack From Cyber Security Increased

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..