
चीनमध्ये संसर्गाबरोबरच मृतांची संख्याही वाढली
बीजिंग : चीनमध्ये कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा हातपाय पसरायला सुरूवात केली असतानाच शनिवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने सरकारी यंत्रणा हादरली आहे. जिलीन प्रांतामध्ये हे दोन मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यामुळे कोरोना मृतांचा अधिकृत आकडा ४ हजार ६३८ एवढा झाला आहे. चीनमध्ये शनिवारी पुन्हा २ हजार १५७ एवढ्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. यातील बहुसंख्य रुग्ण हे जिलीन प्रांतातील आहेत. या प्रांतामधील संसर्ग रोखण्यासाठी लोकांच्या प्रवासावर निर्बंध घालण्यात आले असून राज्याबाहेर पडण्यासाठी नागरिकांना पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. या वाढत्या संसर्गाचा मोठा फटका हॉंगकाँगलाही बसला आहे.
देशाचे अर्थकारण सावरण्यासाठी तेथील सरकारने काही कंपन्या आणि उद्योग समूहांना सवलती देऊ केल्या होत्या. हाँगकाँगचे कार्यकारी प्रमुख कॅरी लाम यांनी पुढील टप्प्यातील सवलतींमधून ज्या कंपन्यांना कोरोनाचा फटका बसला नव्हता अशांना वगळण्यात येईल असे जाहीर केले त्यात काही सुपरमार्केट्स आणि फार्मा कंपन्यांचाही समावेश आहे. दक्षिण कोरियामध्ये बाधितांची संख्या वाढली असून ६ लाख लोक लॉकडाउनमध्ये आहे.
Web Title: China The Death Risen With The Corona Outbreak Beijing
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..