अमेरिका-तैवानच्या मैत्रीने घाबरला ड्रॅगन, चीनने सीमेवर पाठवली लढाऊ विमानं

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 20 September 2020

मागील काही दिवसांपासून चीन-तैवानमधील वाद वाढताना दिसतोय. चीन तैवानचं  (Taiwan) सार्वभौमत्व मान्य करत नसून तैवान हा चीनचाच  (China) भाग असल्याचा दावा करत आला आहे.

तायपेई: मागील काही दिवसांपासून चीन-तैवानमधील वाद वाढताना दिसतोय. आतापर्यंत चीननं तैवानचं  (Taiwan) सार्वभौमत्व मान्य केलं नसून तैवान हा चीनचाच  (China) भाग असल्याचा दावा चीन करत आला आहे. दुसऱ्याबाजूला तैवान यास वारंवार नकार देत आला आहे. या पार्श्वभूमीवरच तैवानची अमेरिकीशी होत असणारी सलगी चीनला धोकादायक वाटत आहे. यामुळेच शनिवारी चीनची लढाऊ विमानं सलग दुसर्‍या दिवशी तैवानच्या हद्दीत आली होती. 

तैवानमध्ये लोकशाही पसरवण्यात मोठा वाटा असणारे तैवानचे माजी अध्यक्ष 'ली टेंग हूई' (Lee Teng-hui) यांना श्रद्धांजली दिली जात होती. यावेळेस तैवानचे वरिष्ठ नेते, सरकारी अधिकाऱ्यांबरोबरच अमेरिकेचे (United States) उच्चस्तरीय दूतही उपस्थित होते. त्यावेळेस चीनने हे पाऊल उचललं आहे. अमेरिकेचे उप-परराष्ट्रमंत्री कीथ क्रॅच या कार्यक्रमास उपस्थित असल्याने चीनने या कार्यक्रमात क्रॅच यांच्या उपस्थितीवर जोरदार आक्षेप नोंदविला आणि शुक्रवारी तैवानच्या हद्दीत 18 लढाऊ विमानं पाठविली होती. चीन ही कृती त्यांचं मोठं पाऊल असून यातून चीनने तैवानला इशारा दिला आहे. 

अमेरिका-चीन युद्ध होण्याची भीती; रशियानेसुद्धा सुरू केल्या हालचाली

चीनच्या दोन बॉम्बर विमानांसह 19 लढाऊ विमानांनी हद्द ओलांडली होती, अशी माहिती तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. याबद्दल मंत्रालयानं म्हटलं आहे की, तैवानच्या हवाई दलानंही या चीनच्या कृतीस उत्तल दिलं आहे. सध्या चीनच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी तैवानने हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणाही तैनात केली आहे.

हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम शनिवारी तायपेईच्या एलेथिया विद्यापीठात आयोजित करण्यात आला होता. यावेळी तैवानचे अध्यक्ष त्साई इंग वेनदेखील उपस्थित होते. महत्त्वाचे म्हणजे ली टेंग हूई को यांचा तैवानमध्ये शांतता आणण्यात आणि लोकशाहीशी स्थापना करण्यात मोठा वाटा आहे. ली यांनीच तैवानची राजकीय ओळख वेगळी करुन तैवानला चीनच्या भूमीपासूनही वेगळं केलं होतं. पण चीन तैवानला स्वतःचाच एक वेगळा प्रांत मानतो.

 लडाख भागात असे काय आहे, ज्यामुळे चीन भारतासोबत घेतोय टक्कर?

 ग्लोबल टाईम्स काय म्हणालं-
माजी अध्यक्ष ली यांचं वयाच्या 97 व्या वर्षी 30 जुलैला रोजी  झालं होतं. कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे (Chinese Communist Party) असणारे मुखपत्र ग्लोबल टाईम्सनं शुक्रवारी एका संपादकीयमध्ये लिहिले आहे की, " जेवढं तैवान अमेरिकेच्या जवळ जाईल, तितकं पिपल्स लिबरेशन आर्मीचे लढाऊ विमानं तैवानच्या जवळ येतील."

(edited by- pramod sarawale)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China upset with US Taiwan friendship sent 19 fighter aircraft for the second consecutive day