हेरगीरीसाठी चीनची लिंक्डइन द्वारे भरती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या लोकांच्या भरतीत परराष्ट्र सेवा बजावलेल्या अधिकाऱ्यांचा वापर केला जात आहे. लिंक्डइन हे हेरांच्या शोधासाठी सोईचे व्यासपिठ असल्याचे कॅलिफोर्निया इंन्स्टीट्यूटच्या ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधनातून पुढे आले आहे.

वॉशिंगटन: ओबामा प्रशासनातील परराष्ट्र सेवेतील जेष्ठ अधिकाऱ्याला लिंक्डइन या सोशल साईटवरून, "तुम्ही चीन मध्ये या, तुम्हाला चांगल्या पगाराच्या नोकरी मिळेल". असा संदेश आला होता. त्या अधिकाऱ्याला धक्का बसला. कारण या नोकरीचे स्वरूप होते, चीनसाठी हेरगीरी करणे. अशाच आशयाचा संदेश डॅनिश देशाचे माजी परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यालाही आला. त्यांनाही " तुम्ही चीन मध्ये या तु्म्हाला चीनमधील महत्वाच्या संशोधनावर काम करण्याची संधी मिळू शकते." असा संदेश एक महिला एजंट पाठवत होती. 

चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या लोकांच्या भरतीत परराष्ट्र सेवा बजावलेल्या अधिकाऱ्यांचा वापर केला जात आहे. लिंक्डइन हे हेरांच्या शोधासाठी सोईचे व्यासपिठ असल्याचे कॅलिफोर्निया इंन्स्टीट्यूटच्या ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधनातून पुढे आले आहे. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी विविध देशातील उच्चपदस्त अधिकाऱ्यांना धोक्याचा इशारा दिला आहे. या देशांमध्ये अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्स सारख्या देशांचा सामावेश आहे. हजारो लिंक्डइन वापरकर्ते हेरगीरीसाठी चीनी सरकारी एजंटच्या संपर्कात असल्याचे, गुप्तचर संस्थांनी म्हटले आहे. अशी भरती करण्यासाठी चीनी एजंट मोठ्या प्रमाणावर कार्यरत असल्याचे अमेरिकेच्या उच्चपदस्त अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ही सायबर घुसखोरी असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले
आहे.

परराष्ट्र सेवेत किंवा संरक्षण खात्यात काम करणाऱ्या लोकांना हजारो फेक अकाऊंट्स द्वारे रिक्वेस्ट पाठवण्यात येतात. अमेरिकेत हेर पाठवण्याएवजी अशा पद्धतीने परराष्ट्र धोरणात काम करणाऱ्यांना चीनकडून लक्ष करण्यात येत आहे. अमेरिका चीनसंदर्भात काय नकारात्मक गोष्टी सोशल मिडीयावर पसरवते यासंदर्भात चीनने गेल्या आठवड्यात हेरगीरी करून पाहिले आहे. हॉंगकॉग मध्ये सुरू असलेल्या लोकशाही समर्थक आंदोलनाबाबत चुकीची माहिती पसरवणारे 1000 पेक्षा अधिक बनावट प्रोफाईल फेसबुक, ट्वीटर आणि युट्यूबने डिलीट केले आहे. 

लिंक्डइन ही सुद्धा प्रभावी सोशल मिडीया साईट असल्याने या माध्यमाचाही हेरगिरी करण्यासाठी वापर करता येतो. इतर जगप्रसिद्ध सोशल नेटवर्कींग साईट्स म्हणजेच फेसबुक, ट्वीटर आदींप्रमाणे लिंकडइन या सोशल मिडीया साईटला चीन मध्ये बंदी नाही. कारण, संवेदनशील पोस्टवर बंधने आणण्यावर लिंकडइनने सहमती दर्शवली आहे. 

नुकतेच सरकारी सेवेतून निवृत्त झालेले किंवा सेवा सोडलेल्या लोकांकडे चीनी हेरांचे लक्ष असते. कारण ते नविन नोकरीच्या शोधात असतात. त्यांना चीनमध्ये गडगंज पगाराच्या नोकरीच्या संधी़च्या ऑफर दिल्या जातात. परंतु लिंक्डइनचे म्हणणे आहे की, त्यांचे फेक अकाऊंट्सवर लक्ष असते. ते सरकारी असले तरी त्यांना डिलीट करण्यात येते. गेल्या काही काळापासून लिंक्डइन हे नोकर भरतीचे महत्वाचे साधन झाले आहे. त्यामुळे हेरांच्या भरतीसाठी देखील आता लिंक्डइनचा वापर होऊ लागला आहे. सीआयएचे अधिकारी केविन पॅट्रीक मल्लोरीला चीनसाठी हेरगिरी केल्याने 20 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China Uses LinkedIn to Recruit Spies Abroad