चीनच्या लसीची चाचणी परदेशांत

वृत्तसंस्था
Monday, 13 July 2020

परदेशांमधील चिनी बांधकाम कंपन्या प्रायोगिक लस घेण्यास उत्सुक आहेत.  या लस आणीबाणीच्या परिस्थितीत रोगप्रतिबंधाच्या उद्देशाने तत्काळ वापरण्यासाठी लवकरच चर्चा सुरु व्हायला हवी.  

सुझोऊ (चीन) - चीनच्या लष्कराशी संलग्न असलेल्या कॅनसिनो बायोलॉजिक्स कंपनीने कोरोनावरील लसीची तिसऱ्या टप्याची चाचणी परदेशात घ्यायचे ठरविले आहे. देशातील संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात यश आल्यामुळे ही चाचणी व्यापक प्रमाणावर तेथे घेणे कंपनीसाठी अवघड झाले आहे. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. येथे झालेल्या संसर्गविरोधी औषध निर्मितीवरील परिषदेत ही माहिती देण्यात आली.

तिसऱ्या टप्याची चाचणी लवकर सुरु होण्याची शक्यता आहे. त्यासाठी ४० हजार स्वयंसेवकांची भरती करण्याची योजना आहे.
- क्वीयू डाँगशू,  कार्यकारी संचालक

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

परदेशांमधील चिनी बांधकाम कंपन्या प्रायोगिक लस घेण्यास उत्सुक आहेत. या लस आणीबाणीच्या परिस्थितीत रोगप्रतिबंधाच्या उद्देशाने तत्काळ वापरण्यासाठी लवकरच चर्चा सुरु व्हायला हवी.
- झेंग गुआंग, चीनचे साथरोगतज्ञ

कमी देशांचा प्रतिसाद
रशिया, ब्राझील, चिली आणि सौदी अरेबिया या देशांशी संपर्क साधण्यात आला असून चर्चा सुरु आहे, मात्र आत्तापर्यंत फार कमी देशांनी सहमती दर्शविली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लष्करासाठी यापूर्वीच वापर
कॅनसिनोने गेल्या महिन्यातच लष्करासाठी लस वापरण्यास प्रारंभ केला. सरकारी मालकीच्या संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना परदेशात जाण्यापूर्वी दोन प्रायोगिक डोस टोचले जातात.

कॅनसिनो लसीच्या आघाडीवर
    संभाव्य लसीचे पारिभाषिक नाव Ad5-nCov
    मार्च महिन्यातच माणसांवर प्रयोगास प्रारंभ
    हा टप्पा गाठणारी चीनमधील पहिली कंपनी
    चाचण्यांच्या पुढील प्रगतीत मात्र पिछाडीवर
    सिनोव्हॅक बायोटेक व सिनोफार्म या इतर दोन प्रायोगिक लसींच्या चाचणीचा तिसरा टप्पा यापूर्वीच सुरु
    सिनोफार्म हे चिनच्या राष्ट्रीय फार्मास्युटीकल समुहाचे युनिट
    लसीच्या दुसऱ्या टप्याचे निष्कर्ष पहिल्या टप्याच्या तुलनेत सरस
    दुसऱ्या टप्यात ५०८ माणसांवर चाचणी
    सुरक्षितता आणि प्रतिकारशक्ती निर्मिती क्षमतेबाबत सरस प्रतिसाद
    कॅनसिनोकडून नव्या फॅक्टरीची उभारणी
    ती झाल्यानंतर पुढील वर्षाच्या प्रारंभी १० ते २० कोटी डोसचे उत्पादन करणे शक्य होणार

Edited by : Kalyan Bhalerao


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China vaccine test in foreign