esakal | चीन करणार अमेरिकेच्या दोनशे अब्ज डॉलरच्या वस्तूंची खरेदी
sakal

बोलून बातमी शोधा

China will buy US 200 billion dollar worth of goods

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकची इतर देशांशी व्यापारातील तफावत कमी करण्यासाठी आक्रमक पावले उचलत आयात पोलाद व ऍल्युमिनियवर जादा कर आकारला आहे. याचबरोबर चीनमधील वस्तूंच्या आयातीवर जादा कर आकारण्याचा इशारा दिला आहे.

चीन करणार अमेरिकेच्या दोनशे अब्ज डॉलरच्या वस्तूंची खरेदी

sakal_logo
By
पीटीआय

वॉशिंग्टन : अमेरिकेसोबतच्या व्यापारातील तफावत कमी करण्यासाठी चीनकडून दोनशे अब्ज डॉलरच्या अमेरिकी वस्तूंची खरेदी होण्याची शक्‍यता आहे. चीनसोबतच्या व्यापारातील तफावत कमी करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक पावले उचलली आहेत. त्यामुळे चीनकडून अशाप्रकारचा निर्णय घेतला जाऊ शकतो. 

चीनने अमेरिकेतून आयात होणाऱ्या 50 अब्ज डॉलरच्या वस्तूंवर जादा कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अमेरिकेत आयात होणाऱ्या 150 अब्ज डॉलरच्या चिनी वस्तूंवर 25 टक्के कर आकारण्याची धमकी अमेरिकेने दिली आहे. मागील काही काळापासून दोन्ही देशांतील व्यापारी संबंध ताणले गेले आहेत. चीनचे उपाध्यक्ष लिऊ हे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची अमेरिकेच्या मंत्री आणि अधिकाऱ्यांशी दोन दिवस चर्चा सुरू आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी लिऊ यांना काल व्हाईट हाऊसमध्ये पाचारण केले होते. चीनच्या शिष्टमंडळाने अमेरिकेसोबतच्या व्यापारातील तफावत कमी करण्यासाठी 200 अब्ज डॉलरच्या वस्तू खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे चीनसोबतच्या व्यापारातील अमेरिकेची तफावत कमी होण्यास मदत होणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकची इतर देशांशी व्यापारातील तफावत कमी करण्यासाठी आक्रमक पावले उचलत आयात पोलाद व ऍल्युमिनियवर जादा कर आकारला आहे. याचबरोबर चीनमधील वस्तूंच्या आयातीवर जादा कर आकारण्याचा इशारा दिला आहे. यामुळे अमेरिका आणि चीन यांच्या संबंधात तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर चीनने शिष्टमंडळ अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. 

- दोन्ही देशांमधील व्यापारी संबंधातील तणाव कमी होणार 
- चीन करणार दोनशे अब्ज डॉलरच्या अमेरिकी वस्तूंची खरेदी 
- सोयाबीनसह अन्य कृषी उत्पादने, सेमीकंडक्‍टर, नैसर्गिक वायूचा समावेश 

- चीनसोबतच्या व्यापारातील अमेरिकेची तफावत 500 अब्ज डॉलर 
- चीनच्या उत्पादनांवरील जादा कर अमेरिकेकडून मागे घेतला जाणार 
- डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक धोरणांना यश मिळाल्याचे चित्र 

loading image