
बीजिंग : ‘‘भारत आणि चीन या दोन्ही देशांनी मैत्रीसाठी पुढाकार घ्यावा आणि परस्परांवर संशय घेण्यापेक्षा सामंजस्य दाखवावे,’’ असे आवाहन चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी आज केले. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री हे चीन दौऱ्यावर गेले असून आज त्यांनी वँग यी यांची भेट घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली.