चीनकडे जगातील सर्वात शक्तीशाली सैन्य, पण अमेरिकेला आहे एक मोठा फायदा

कार्तिक पुजारी
Tuesday, 14 July 2020

गेल्या काही दशकामध्ये चीनने संरक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड सुधारणा केली आहे. चीनने शस्त्रास्त्रांच्या अद्ययावतीकरण आणि आधुनिकीकरणासाठी पाण्यासारखा पैसा ओतला आहे.

नवी दिल्ली- गेल्या काही दशकामध्ये चीनने संरक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड सुधारणा केली आहे. चीनने शस्त्रास्त्रांच्या अद्ययावतीकरण आणि आधुनिकीकरणासाठी पाण्यासारखा पैसा ओतला आहे. असे असले तरी शस्त्रास्त्रांचा वापर प्रत्यक्ष युद्धात करण्यामध्ये चीनचा अनुभव अमेरिकेपेक्षा कितीतरी कमी आहे.  

PTI ला मोदी सरकारकडून 84 कोटींचा दंड; कारण...
फेब्रुवारी 1979 मध्ये चीनच्या लिबरेशन आर्मीने (पीएलए) शेवटचे मोठे युद्ध लढले होते. व्हिएतनामसोबत झालेल्या या युद्धात चीनच्या सैन्याला मोठे नुकसान सहन करावे लागले होते. चीनने हे युद्ध जिंकलं होतं, पण 26,000 ते 30,000 चिनी सैन्य यात मारले गेल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. या युद्धापासून प्रत्येक चिनी अध्यक्षाने संरक्षण क्षेत्र सुधारणेला प्राथमिकता दिली आहे. विशेष करुन सध्याचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी शस्त्रास्त्र आधुनिकीकरणाचा सपाटा लावला आहे.

अमेरिकेनंतर चीन आपल्या लष्करावर सर्वाधिक खर्च करते. गेल्या 40 वर्षात चीनने शस्त्रास्त्र संख्या कित्येकपटीने वाढवली आहे. चीनने आपली लष्कर क्षमता कमालीची वाढवली असली तर चीनकडे एका गोष्टीची कमतरता आहे, तो म्हणजे अनुभव. अमेरिका आणि नाटो राष्ट्रांचा युद्ध परस्थितीला सामोरे जाण्याचा अनुभव  दांडगा आहे. 

चीनने 1979 नंतर एकही मोठे युद्ध लढले नाही, तर अमेरिका 2001 पासून अनेक देशांमध्ये लढाई करत आहे. अमेरिका अनेक पातळ्यांवर युद्ध लढत आहे. खास करुन अमेरिका तंत्रज्ञानाची जाण नसलेल्या शत्रूशी युद्ध लढत आहे. अनेक दशकांच्या सततच्या लढाईमुळे अमेरिकेच्या पाठीशी मोठा अनुभव आहे. युद्धाच्या परस्थितीला कसे सामोरे जायचे आणि प्रत्यक्ष मैदानात युद्ध कसे लढायचे याबाबत अमेरिकेला चांगले ज्ञान आहे. शिवाय प्रत्यक्ष युद्धाला सामोरे गेलेले अनेक दिग्गज अमेरिकेकडे आहेत.

अमेरिकी कंपन्यांचा हाँगकाँगला गुडबाय?
मित्र राष्ट्रांसोबत मिळून युद्ध करण्याचा अनुभव अमेरिकेकडे आहे. अनेक देशांमध्ये अमेरिकेने मित्रराष्ट्रांना सोबत घेऊन शत्रूला नामोहरण केले आहे. चीनने गेल्या काही वर्षांपासून संयुक्त युद्ध सराव सुरु केला आहे. त्यामुळे इतर देशाच्या सैन्याला सोबत घेऊन प्रभावी हल्ला करण्याचे चीनला विशेष ज्ञान नाही. संपूर्ण जगात कोठेही युद्धासाठी अमेरिकी सैन्य तयार असते, मात्र चीनबाबत तसं नाही. चिनी सैन्य आपल्या सीमा भागातच शत्रूला कडवे आव्हान देऊ शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chinas military has become one of the worlds most powerful but the US