चीनची लोकसंख्या वाढता वाढेना... 

पीटीआय
मंगळवार, 22 जानेवारी 2019

बीजिंग : चीनच्या लोकसंख्येचा आलेख सातत्याने वाढत असल्याने काही वर्षांपूर्वी चीनमध्ये "एक मूल' योजना होती. पण, त्याचे काही तोटे आढळून आले व देशातील जन्मदर खालावल्याने 2016 मध्ये चीन सरकारने "हम दो हमारे दो'ची घोषणा केली. पण त्याचा परिणाम फारसा झालेला नाही, असे सोमवारी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत माहितीमधून दिसत आहे.

बीजिंग : चीनच्या लोकसंख्येचा आलेख सातत्याने वाढत असल्याने काही वर्षांपूर्वी चीनमध्ये "एक मूल' योजना होती. पण, त्याचे काही तोटे आढळून आले व देशातील जन्मदर खालावल्याने 2016 मध्ये चीन सरकारने "हम दो हमारे दो'ची घोषणा केली. पण त्याचा परिणाम फारसा झालेला नाही, असे सोमवारी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत माहितीमधून दिसत आहे.

चीनमध्ये गेल्या वर्षी जन्मदर दोन लाखाने कमी झाला असल्याचे आकडेवारी सांगते. "नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्‍स (एनबीएस) यांनी ही माहिती प्रसिद्ध केली आहे. जन्मदर घटणे व अर्थव्यवस्थेत मंदी येणे या दोन्हीचा एकत्रित परिणाम म्हणजे देशाला लोकसंख्येविषयक समस्येला सामोरे जावे लागत आहे. याचे कारण म्हणजे चीनमध्ये 60 वर्षांवरील वयोवृद्धांची संख्या 24 कोटी 90 लाख आहे. याचे प्रमाण देशातील एकूण लोकसंख्येच्या 18 टक्के आहे. चीनच्या सरकारने 2016 मध्ये दोन मुले जन्माला घालण्याची परवानगी विवाहितांना दिली. त्या वेळी देशाचा प्रजनन दर 2017 व 2018 मध्ये अनुक्रमे 1.97 व 2.09 असा राहील, अशी शक्‍यता आरोग्य विभागाने व्यक्त केली होती. 2018 मध्ये जन्मणाऱ्या बाळांची संख्या ही 2017 पेक्षा 7.90 लाखाने जास्त असेल, असा अंदाजही वर्तविण्यात आला होता. मात्र, गेल्या वर्षी चीनमध्ये एक कोटी 52 लाख 30 हजार बाळे जन्माला आली. 2017 च्या तुलनेत यात 20 लाखांनी घट झाली आहे. 

तज्ज्ञांच्या मते जन्मदर घटण्याची कारणे 
- मूल होण्याचे महिलांचे वय सरणे 
- जास्त मुलांची इच्छा विवाहितांची नसणे 

ज्येष्ठांच्या वाढत्या संख्येचा परिणाम 
- आरोग्यावरील खर्चात वाढ 
- कामकरी वर्गाची कमतरता 
- अर्थव्यवस्था मंदावली 

सध्याची स्थिती... 
1.395 अब्ज 

एकूण लोकसंख्या 
4 कोटी 90 लाख 
60 वर्षांवरील ज्येष्ठ 

89 कोटी 97 लाख 
19 ते 59 वर्षे वयोगटातील संख्या 

बाळांची संख्या वाढण्याची शक्‍यता चीनच्या आरोग्य विभागाने व्यक्त केली होती. मात्र, प्रत्यक्षात जन्मदर घटला आहे. पुढील दशकात 20 ते 39 वर्षे वयोगटातील महिलांच्या संख्येत 3 कोटी 90 लाखाने घटण्याची भीती आहे. 
- यी फुझियान व ही याफू, लोकसंख्याविषयक तज्ज्ञ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chinas population does not increases