पुस्तके काढून घेतली
हाँगकाँगमधील सार्वजनिक ग्रंथालयांमधील लोकशाहीवादी धुरीणांनी लिहिलेली पुस्तके फडताळांमधून काढून घेण्यात आली आहेत. यात प्रख्यात लोकशाही समर्थक जोशुआ वोंग आणि राजकीय नेत्या तान्या चॅन यांच्या पुस्तकांचा समावेश आहे. नव्या कायद्याच्या पार्श्वभूमीवर या पुस्तकांचा आढावा घेत असल्याचा खुलासा ग्रंथालय चालकांनी केला आहे. आंदोलकांना पाठिंबा दिलेल्या अनेक दुकानदारांनी भिंतींवर लावलेली लोकशाहीचे समर्थन करणारी स्टिकर्स, कलाकृती काढल्या.
हॉंगकॉंग - अर्धस्वायत्त अशा हॉंगकॉंगमध्ये चीनने लादलेल्या नव्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा वापर म्हणजे शोकांतिका होय असे परखड मत हॉंगकॉंग-मकाऊमधील अमेरिकेचे वाणिज्य दूत हॅन्सकॉम स्मिथ यांनी केले.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
त्यांनी सांगितले की, आशियाच्या आर्थिक केंद्रस्थानात मूलभूत स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा, जुलमी वातावरण निर्माण करण्याचा आणि परिक्षण स्वतःच करण्याचा यामागील उद्देश आहे. वास्तविक खुल्या धोरण हेच हाँगकाँगच्या यशस्वीतेचे ठळक वैशिष्ट्य आहे आणि ते जपण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. गेल्या वर्षी सरकारविरोधी निदर्शने झाल्यानंतर गेल्या आठवड्यात हा कायदा मंजूर झाला.
पाकिस्तानच्या मंत्रिमंडळात शिरला कोरोना; काल परराष्ट्रमंत्री तर आज खुद्द...