ऑस्ट्रेलियाच्या पत्रकाराबाबत चीनचे मौन

cheng lei
cheng lei

बीजिंग - ऑस्ट्रेलियाच्या पत्रकार चेंग लेई यांच्या अटकेप्रकरणी चीनने मौन बाळगले. त्यांना 14 ऑगस्ट रोजी ताब्यात घेण्यात आले, पण कोणतेही कारण देण्यात आले नाही. 27 तारखेला त्यांच्याशी बोलणे झाले, पण त्या सार्वजनिक ठिकाणी दिसलेल्या नाहीत. त्यांच्यावर कोणता आरोप ठेवण्यात आला का याचीही माहिती नाही, असे ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सीजीटीएन (चायना ग्लोबल टेलीव्हीजन नेटवर्क) या इंग्रजी भाषेतील सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीच्या सुत्रसंचालिका म्हणून चेंग कार्यरत होत्या. कोरोना विषाणूच्या उगमाबाबत चौकशीची मागणी करण्यात ऑस्ट्रेलियाने पुढाकार घेतल्यानंतर उभय देशांतील संबंध ताणले गेले आहेत. त्यातच व्यापारावरूनही खटके उडत आहेत. परराष्ट्र प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी याविषयीच्या प्रश्नाला बगल दिली. कोणताही तपशील देऊ शकत नाही, पण चीन हा कायद्याचे शासन असलेला देश आहे आणि आम्ही कायद्यानुसार हे प्रकरण हाताळू, असे त्यांनी स्पष्ट केले. चेग यांना घरीच स्थानबद्ध करण्यात आल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियातील प्रसार माध्यमांनी दिले आहे. त्यांना दीर्घ काळ डांबून ठेवण्यात येईल अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाचे व्यापार व पर्यटन मंत्री सायमन बर्मिंगहॅम यांनी सांगितले की, चेंग लेई यांच्याबद्दल आम्हाला खरोखरच चिंता वाटते.

दरम्यान, एएफपी वृत्तसंस्थेने वुईचॅटच्या माध्यमातून चेंग यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यास प्रतिसाद मिळू शकला नाही. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com