चीनला रोखण्यासाठी भारताने सीमारेषेवर तैनात केला T-90 टँकचा ताफा

सुशांत जाधव
Monday, 27 July 2020

कोराकोरम जवळ चीनचे आक्रमण थोपवण्याची ही तयारीच मानली जात आहे. विश्वासू सैन्य सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली आहे.

पूर्वी लडाखमधील गलवान खोऱ्यासह अन्य परिसरातून मागे हटल्यानंतर चीनी सैन्याने अक्साई चीन परिसरात हालचाली सुरु झाल्या आहेत. जवळपास 50 हजार चीनी सैन्य या भागात तैनात करण्यात आल्याचे वृत्त आहे. अक्साइ चीन परिसरातील शेजारील राष्ट्राच्या हालचालीनंतर भारतानेही आक्रमक भूमिका कायम असल्याचे दाखवून दिले आहे. चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने पहिल्यांदाच मिसाइलचा मारा करणाऱ्या T-90 टँकचा ताफा  तैनात केलाय. कोराकोरम जवळ चीनचे आक्रमण थोपवण्याची ही तयारीच मानली जात आहे. विश्वासू सैन्य सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली आहे. पेट्रोलिंग पॉइंट्स 14, 15, 16, 17 आणि पेंगोंग त्सो फिंगर परिसरात चीनी आक्रामकतेनंतर आर्मर्ड पर्सनल कॅरियर्स (एपीसीएस) आणि इन्फेंटरी कॉम्बॅट वाहने (भू-दल चा सामना करण्यासाठी वापरले जाणारे वाहन), एम 777 155mm होवित्जर आणि 130 mm गन्स को पहले ही दौलत बेग ओल्डी सेक्टरमध्ये पूर्वीपासूनच तैनात आहे. 

लष्करी ड्रोन निर्यातीला डोनाल्ड ट्रम्प यांची सहमती

भारतीय लष्कराने  दौलत बेग ओल्डी सेक्टरमध्ये अडवान्स लँडिंग ग्राउंड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या परिसरात टँक देखील तैनात करण्यात आले आहेत. चीनने शक्सगाम खोऱ्यात यापूर्वी 36 किमी रस्ता तयार केला आहे. 5163 चौरसफूट इतकी  जमीन पाकिस्तानने अवैधरित्या चीनला दिली आहे. चीन G-219 (ल्हासा कशगार) महामार्गाला  शक्सगामच्या माध्यमातून कोराकोरमला जोडण्याची शंका भारतीय लष्कराला आहे. यासाठी  शक्सगाम ग्लेशियरच्या पायथ्याला चीनला सूरंग लावावे लागतील. पण चीनकडे यासाठी तंत्रज्ञान आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chinese army aggression in aksai chin india moves squadron of t 90 tanks near karakoram