लष्करी ड्रोन निर्यातीला डोनाल्ड ट्रम्प यांची सहमती

यूएनआय
Sunday, 26 July 2020

अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी लष्करी ड्रोन निर्यात धोरण सुलभ करण्याचा निर्णय घेतला आहे. मित्र देशांना अमेरिकी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त फायदा व्हावा, हा यामागचा उद्देश असल्याचे व्हाइट हाउसने शनिवारी सांगितले. तसेच १९७६ मधील क्षेपणास्र तंत्रज्ञान नियंत्रण व्यवस्थाही बदलण्याचे संकेत त्यांनी या वेळी दिले.

वॉशिंग्टन - अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी लष्करी ड्रोन निर्यात धोरण सुलभ करण्याचा निर्णय घेतला आहे. मित्र देशांना अमेरिकी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त फायदा व्हावा, हा यामागचा उद्देश असल्याचे व्हाइट हाउसने शनिवारी सांगितले. तसेच १९७६ मधील क्षेपणास्र तंत्रज्ञान नियंत्रण व्यवस्थाही बदलण्याचे संकेत त्यांनी या वेळी दिले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

व्हाइट हाउसने म्हटले आहे की क्षेपणास्र तंत्रज्ञान नियंत्रण व्यवस्थेचा उद्देश आता बदलण्याची गरज आहे. तेव्हाची आणि आताची परिस्थिती बरीच बदलली आहे. त्या वेळच्या व्यवस्थेत लष्करी ड्रोनचा उल्लेख नव्हता किंवा त्या वेळी युद्ध, तसेच संघर्षाच्या वेळी ड्रोनचा वापर केला जात नव्हता. मात्र आता त्याचा वापर केला जात आहे. या धोरणामुळे अमेरिकेचे मोठे नुकसान होत आहे. काही ठराविक देशांना या धोरणाचा फायदा झाला आहे. त्यामुळे त्यात बदल आवश्‍यक आहे. निनेटर बॉब मेंडेज यांनी म्हटले आहे की ‘ट्रम्प प्रशासनाने पुन्हा एकदा घातक ड्रोन निर्यात करण्याचा निर्णय घेतल्याने आंतरराष्ट्रीय निर्यात नियंत्रण धोक्‍यात येणार आहे. यामुळे मानव जातीला मोठा निर्माण होऊ शकतो.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Donald Trump agrees to export military drones