चीनमधील कंपन्यांना निर्बंधांचे भय

पीटीआय
Monday, 7 September 2020

चीनमधील सेमिकंडक्टर (अर्धवाहक) निर्मिती करणाऱ्या आघाडीच्या कंपनीवरही लष्कराशी संबंध असल्याच्या कारणावरून निर्बंध घालण्याचे सूतोवाच अमेरिकेने केले आहेत. या कंपनीने आपला लष्कराशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे.

बीजिंग - चीन सरकारच्या विविध धोरणांमुळे या देशावर संशय व्यक्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. चिनी कंपन्यांनाही अनेक ठिकाणी बहिष्काराला सामोरे जावे लागत असून, त्यांच्यावर अनेक निर्बंधही घातले जात आहेत. आता चीनमधील सेमिकंडक्टर (अर्धवाहक) निर्मिती करणाऱ्या आघाडीच्या कंपनीवरही लष्कराशी संबंध असल्याच्या कारणावरून निर्बंध घालण्याचे सूतोवाच अमेरिकेने केले आहेत. या कंपनीने आपला लष्कराशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिकेतील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, चीनमधील ‘सेमिकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग इंटरनॅशनल कॉर्पोरेशन’ (एसएमआयसी) या कंपनीच्या व्यवहारांवर देखरेख ठेवण्यासाठी हालचाली सुरु आहेत. अमेरिकेतून तंत्रज्ञान किंवा सुटे भाग खरेदी करण्यासाठी सरकारची परवानगी आवश्‍यक असणाऱ्या कंपन्यांच्या यादीत या कंपनीचा समावेश करण्याचा विचार अमेरिका करत आहे. या कंपनीच्या माध्यमातून चिनी लष्कर अमेरिकेत हेरगिरी करत असल्याचा आणि कंपनीच्या उत्पादनाचा वापर चिनी लष्करासाठी केला जात असल्याचा संशय व्यक्त झाला आहे. कंपनीने मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. ‘आमची उत्पादने केवळ जनतेच्या वापरासाठी आणि व्यावसायिक कारणांसाठी आहेत. याबद्दल गैरसमज झाला असून आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत,’ असे आवाहन कंपनीने केले आहे. इतर देशांवरील अवलंबित्व कमी करण्याच्या हेतूने चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने ‘एसएमआयसी’ ही कंपनी उभारली आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अमेरिकेचा चीनवर संशय
अमेरिकेतून तंत्रज्ञान घेऊन त्याचा वापर शस्त्रनिर्मितीसाठी
अमेरिकी कंपन्यांना स्पर्धा करू शकणाऱ्या कंपन्या स्थापन करण्याचा प्रयत्न
कंपनीच्या माध्यमातून अमेरिकेत हेरगिरी

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chinese companies are also facing boycotts

Tags
टॉपिकस
Topic Tags: