अरेरे! कोरोनाचा शोध लावलेल्या डॉक्टरचाच दुःखद अंत

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

वुहान : चीनमध्ये 'कोरोना'ने सध्या थैमान घातले असून जवळपास ५०० जाणांचा जीव या कोरोनामुळे गेला आहे. पण सगळ्यात दुःकद बातमी म्हणजे, ज्या डॉक्टरने कोरोनाचा व्हायरस पसरत आहे याची माहिती दिली होती त्या ली वेनलियांग या डॉक्टरचाच मृत्यू झाला आहे.

'कोरोनापासून जगाला वाचवायचंय तर..'; 6 कोटी नागरिकांबाबत चीन सरकारचा मोठा निर्णय!

वुहान : चीनमध्ये 'कोरोना'ने सध्या थैमान घातले असून जवळपास ५०० जाणांचा जीव या कोरोनामुळे गेला आहे. पण सगळ्यात दुःकद बातमी म्हणजे, ज्या डॉक्टरने कोरोनाचा व्हायरस पसरत आहे याची माहिती दिली होती त्या ली वेनलियांग या डॉक्टरचाच मृत्यू झाला आहे.

'कोरोनापासून जगाला वाचवायचंय तर..'; 6 कोटी नागरिकांबाबत चीन सरकारचा मोठा निर्णय!

कोरोनाची प्रथम लक्षणे या ली यांना दिसली होती. यावरून त्यांनी कोरोना व्हायरसची चीनमध्ये लागण झाल्याची माहिती दिली होती. पण दुर्दैव म्हणजे याच कोरोनाने ली यांचा जीव घेतला. चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने ही माहिती दिली. डॉ. ली वेनलियांग यांच्यासह आठ जणांनी चीनमध्ये कोरोना विषाणू पसरत असून हा आजार जीवघेणा असल्याचे जाहीर केले होते. पण भयंकर प्रकारे पसरलेल्या कोरोनाने चक्क डॉक्टर ली यांनाच आपल्या विळख्यात अडकवले.  इतर डॉक्टरांनी त्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्याला अपयश येऊन वुहान येथे ली यांचा मृत्यू झाला आहे.  

Image result for Li Wenliang

मोठी ब्रेकिंग : चीन 20 हजार कोरोनाग्रस्तांना ठार मारणार?; कोर्टाकडे मागणी

वुहानच्या मासळी बाजारात ३० डिसेंबरला कोरोनाचे सात रूग्ण आढळले होते. या रूग्णांच्या लक्षणांचा अभ्यास करून त्यांना कोरोना हा भयानक संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. हा विषाणू झपाट्याने पसरत असून लवकरच यावरील खबरदारी घ्यायला हवी असा अहवाल डॉ. ली व त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारला दिला होता. मात्र अशा प्रकारच्या अफवा पसरवल्याचा आरोप चीन पोलिसांनी केला होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीन 20 हजार कोरोनाग्रस्तांना ठार मारणार?; कोर्टाकडे मागणी
कोरोना विषाणूंच्या संसर्गाला रोखण्यासाठी चीन आता अघोरी मार्गाचा अवलंब करणार असून यान्वये हा संसर्ग झालेल्या 20 हजार रूग्णांना ठार मारले जाणार आहे. चीनमधील सर्वोच्च न्यायालय असणारे सुप्रीम पीपल्स कोर्ट हे उद्या (ता.७) सामूहिक हत्येला परवानगी देऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली. चीन सरकारनेच न्यायालयाकडे ही मागणी केली असल्याचे एका संकेतस्थळाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chinese dr Li Wenliang who founds Corona dies due to corona