esakal | सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात; चीनचे स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Chinese Explanation That Situation On The Border Is Under Control

भारत व चीन यांच्यात सीमेवर तणावाची स्थिती असल्याच्या पार्श्वभूमीवर सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे चीनने स्पष्टीकरण दिले आहे. दोन्ही देशात संवाद व सल्लामसलतीच्या मार्गाने प्रश्न सोडवण्यासाठी यंत्रणा कार्यरत असल्याचे चीनकडून सांगण्यात आले आहे.

सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात; चीनचे स्पष्टीकरण

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारत व चीन यांच्यात सीमेवर तणावाची स्थिती असल्याच्या पार्श्वभूमीवर सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे चीनने स्पष्टीकरण दिले आहे. दोन्ही देशात संवाद व सल्लामसलतीच्या मार्गाने प्रश्न सोडवण्यासाठी यंत्रणा कार्यरत असल्याचे चीनकडून सांगण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक कराचीनचे अध्यक्ष जिनपिंग यांनी भारतालगत सीमेवर युद्धसज्जतेसाठी कुमक वाढवण्याचे आदेश दिले आहेत. देशाच्या सार्वभौमतेचे निकराने रक्षण केले पाहिजे असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. त्यावर चीनकडून स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, प्रादेशिक सार्वभौमत्व व सुरक्षा यांचे रक्षण करणे हे आमचे काम आहे. त्याचबरोबर सीमेवर शांतता व स्थिरतेचे वातावरण निर्माण केले जाईल. दोन्ही देशात सीमेवरील परिस्थिती स्थिर व नियंत्रणात आहे. सीमेवर ज्या हालचाली होत असतात त्यातील वादांचे निराकरण करण्यासाठी दोन्ही देशात संवाद यंत्रणा आहे. त्यातून सल्लामसलतीने हे प्रश्न सुटू शकतात. दोन्ही देशांत सीमा प्रश्नावरील मुद्दे व इतर गोष्टींसाठी संवाद व राजनैतिक यंत्रणा आहेत, असेही चीनकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

आरबीआय बॉँड्समध्ये गुंतवणूक करायची आहे? मग ही आहे शेवटची संधी...

दरम्यान, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी सांगितले की, दोन्ही देशातील सीमा प्रश्नाशी निगडित चीनची भूमिका सातत्यपूर्ण व स्पष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात दोनदा अनौपचारिक चर्चा झाल्या होत्या त्यावेळी सीमेवर शांतता निर्माण करण्यासाठी विश्वासवर्धक उपायांवर भर देण्यात आला होता. तेव्हा दोन्ही नेत्यात जे मतैक्य झाले त्या दिशेनेच आमची वाटचाल सुरू आहे.