पाकव्याप्त काश्‍मीर भारताचाच भूभाग; चिनी वृत्तवाहिनीचा दावा 

पीटीआय
शनिवार, 1 डिसेंबर 2018

वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय राजकारणात नेहमीच भारतावर कुरघोडी करणाऱ्या चीनच्या परराष्ट्रधोरणात मोठ्या बदलाचे संकेत मिळत आहेत. चीनने प्रथमच पाकव्याप्त काश्‍मीरला भारताचा भाग म्हणून दर्शविला आहे. एका चिनी सरकारी वृत्तवाहिनीने पाकव्याप्त काश्‍मीर थेट भारताच्या नकाशासोबत जोडले.

आतापर्यंत चीन या भागाला पाकिस्तानचाच घटक मानत असे, भारताने चीनच्या या दुटप्पी भूमिकेला नेहमीच विरोध केला आहे. 

मध्यंतरी कराचीतील चीनच्या वाणिज्य दूतावासावर काही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, या हल्ल्याचे वृत्त दाखविताना पाकव्याप्त काश्‍मीरचा भागही दाखविण्यात आला होता, यामध्ये पूर्ण जम्मू काश्‍मीरला भारताचा भूभाग असे संबोधण्यात आले होते.

दरम्यान, चीनने हे पाऊल नेमके का उचलले किंवा ही संबंधित वृत्तवाहिनीची चूक होती का, असे अनेक प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित केले जाऊ लागले आहेत. दरम्यान, चीनने खरंच त्यांच्या धोरणात बदल केला असेल तर याचा परिणाम चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरच्या उभारणीवरदेखील होऊ शकतो, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

या माध्यमातून चीनने पाकिस्तानला संदेश देण्याचा प्रयत्न केला असल्याचेही काही जाणकारांना वाटते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chinese TV channel shows PoK as integral part of India