कोलेस्टेरॉलबद्दल आता भीतीची गरज नाही; अमेरिकेचा अहवाल

वृत्तसंस्था
शनिवार, 14 एप्रिल 2018

कोलेस्टेरॉलविषयी जेवढी उत्सुकता, भीती व गैरसमज आहेत तेवढे इतर कशाबद्दलही नसतील. त्याचे कारण कोलेस्टेरॉलचा हृदयविकाराशी जोडलेला संबंध. परंतु, कोलेस्टेरॉलयुक्त पदार्थ खाल्ल्याने खरोखरच हृदयविकार जडतो का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. याचे कारण म्हणजे अमेरिकेतील राष्ट्रीय सर्वोच्च पोषण सल्लागार समितीच्या एका अहवालानुसार कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असलेले अन्न खाण्याबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला होता. यामुळे अमेरिकेतील खाद्यसंस्कृतीवरच त्याचा परिणाम झाला. आता मात्र या समितीने अन्नातील कोलेस्टोरॉल ही चिंतेची बाब नसल्याचे म्हटले आहे.

कोलेस्टेरॉलविषयी जेवढी उत्सुकता, भीती व गैरसमज आहेत तेवढे इतर कशाबद्दलही नसतील. त्याचे कारण कोलेस्टेरॉलचा हृदयविकाराशी जोडलेला संबंध. परंतु, कोलेस्टेरॉलयुक्त पदार्थ खाल्ल्याने खरोखरच हृदयविकार जडतो का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. याचे कारण म्हणजे अमेरिकेतील राष्ट्रीय सर्वोच्च पोषण सल्लागार समितीच्या एका अहवालानुसार कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असलेले अन्न खाण्याबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला होता. यामुळे अमेरिकेतील खाद्यसंस्कृतीवरच त्याचा परिणाम झाला. आता मात्र या समितीने अन्नातील कोलेस्टोरॉल ही चिंतेची बाब नसल्याचे म्हटले आहे. तसेच शरिराच्या योग्य पोषणासाठी कोलेस्टरॉ़लयुक्त अन्न आवश्यक असल्याचेही समितीच्या अहवालात नमुद करण्यात आले आहे.

गेल्या पाच वर्षांच्या संशोधनाच्या आधारावर समितीने कोलेस्टेरॉल बद्दलचा दृष्टीकोन बदलला असून, यामुळे गेल्या चाळीस वर्षांपासून कोलेस्टेरॉल बद्दल गैरसमजुत असल्याचे या समितीने म्हटले आहे. 

असे असले तरी काही आहारतज्ज्ञांनी मात्र ज्या व्यक्तिंना मधुमेह आणि हृदयविकाराचा त्रास आहे. अशांनी कोलेस्टरॉलबद्दल जागरुकता बाळगण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये अंडी, लॉब्स्टर यांसारखे पदार्थ खाण्यास हरकत नसल्याचे या आहारतज्ञांनी म्हटले आहे. परंतु, चरबियुक्त पदार्थ जसे की, मांस, पूर्ण क्रिम असलेले दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, लोणी खाण्याचे टाळण्याचा सल्ला या आहारतज्ञांनी दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cholesterol is finally officially removed from Naughty List