आता प्रत्येक सिगारेटच्या पॅकेजवर मिळणार 'मृत्यू'ची चेतावणी; 'या' देशात सुरू होणार नवा नियम

Cigarettes
Cigarettesesakal
Summary

कॅनडा पुन्हा एकदा धुम्रपानाच्या बाबतीत जगासमोर मोठं उदाहरण ठेवणार आहे.

सिगारेटच्या (Cigarettes) पॅकेटवर कॅन्सरच्या धोक्याचा इशारा छापलेला तुम्ही सर्वांनी पाहिलाच असेल; पण लवकरच तुम्हाला प्रत्येक सिगारेटवर कॅन्सरचा धोका असणारा इशारा दिसेल. वास्तविक, कायद्यानुसार सिगारेट विकणाऱ्या कंपन्यांना सिगारेटच्या पॅकेटवर वैधानिक इशारा लिहिणं बंधनकारक आहे. यामध्ये सिगारेटमुळं होणाऱ्या हानी आणि कॅन्सरबाबत इशारे (Health Warning) छापण्यात आले आहेत.

सिगारेटच्या वाढत्या वापरामुळं होणारे वाढते आजार पाहता, आता लवकरच प्रत्येक सिगारेटवर हा वैधानिक इशारा छापलेला दिसेल. जेणेकरून लोकांच्या मनात सिगारेटमुळं होणाऱ्या हानीबाबत जागरूकता निर्माण करता येईल. कॅनडा हा प्रत्येक सिगारेटवर वैधानिक कर्करोगाचा इशारा देणारा जगातील पहिला देश बनलाय. कॅनडामध्ये (Canada) प्रत्येक सिगारेटवर आरोग्यविषयक चेतावणी चिन्हांकित करणं आवश्यक आहे. यापूर्वी देशात तंबाखूजन्य पदार्थांच्या पॅकेजिंगवर इशारा म्हणून ग्राफिक चित्र लावण्याचं धोरण लागू करण्यात आलं होतं.

कॅनडा पुन्हा एकदा धुम्रपानाच्या बाबतीत जगासमोर मोठं उदाहरण ठेवणार आहे. प्रत्येक सिगारेटवर आरोग्यविषयक इशारे लिहिणारा कॅनडा हा जगातला पहिला देश ठरणार आहे. दोन दशकांपूर्वी कॅनडानं तंबाखूजन्य पदार्थांच्या पॅकेजिंगवर ग्राफिक फोटो आणि चेतावणी संदेश लिहायला सुरुवात केलीय.

Cigarettes
PUBG : वडिलांनी पब्जी खेळण्यास नकार दिल्यानं मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

कॅनडाचे मानसिक आरोग्य आणि व्यसनाधीनता मंत्री कॅरोलिन बेनेट म्हणाले, 'सध्या लोक तंबाखूजन्य पदार्थांच्या पाकिटांवर लिहिलेल्या इशाऱ्यांकडं लक्ष देत नाहीयत. या संदेशांमुळं त्यांचं नावीन्य आणि त्यांचा प्रभाव कमी झाला आहे या गोष्टीकडं आपण लक्ष देण्याची गरज आहे. प्रत्येक तंबाखू उत्पादनांना आरोग्यविषयक चेतावणी दिल्यास हे आवश्यक संदेश लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, अनेकदा तरुणच पहिल्यांदा सिगारेटचं सेवन करतात. त्यामुळं आम्हाला हा निर्णय घ्यावा लागलाय.'

Cigarettes
2024 च्या विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार : आठवले

कॅरोलिन बेनेट पुढं म्हणाले, 2023 च्या उत्तरार्धात या नव्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची योजना आखलीय. याअंतर्गत आपण प्रत्येक सिगारेटवर 'प्रत्येक पाकिटमध्ये विष' असा संदेश लिहिणार आहोत. या प्रस्तावाचं स्वागत करताना कॅनडा हार्ट अँड स्ट्रोक फाऊंडेशनचे सीईओ डग रॉथ म्हणाले, 'कॅनडामध्ये आता सिगारेटसाठी जगातील सर्वात मजबूत आरोग्यविषयक सूचना देणारी यंत्रणा उपलब्ध होणार आहे. ही घातक उत्पादनं आहेत आणि या उपायांमुळं धूम्रपान कमी होण्यास मदत होईल.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com