न्यूझीलंडमध्ये कधीही सिगारेट अथवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करता येणार नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tobacco
न्यूझीलंडमध्ये कधीही सिगारेट अथवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करता येणार नाही

न्यूझीलंडमध्ये कधीही सिगारेट अथवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करता येणार नाही

वेलिंग्टन - नागरिकांमधील तंबाखू सेवन कायमस्वरुपी बंद करण्यासाठी न्यूझीलंड सरकारने एक अभिनव योजना तयार केली आहे. ही योजना अमलात आल्यास सध्या १४ किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या असलेल्या मुला-मुलींना त्यांच्या पुढील आयुष्यात कधीही सिगारेट अथवा इतर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करता येणार नाही.

न्यूझीलंड सरकारने कायद्याचा मसुदा जाहीर केला आहे. या प्रस्तावित कायद्यानुसार, सिगारेट खरेदी करण्याच्या किमान वयात दरवर्षी वाढ केली जाणार आहे. म्हणजेच, कायदा अस्तित्वात आल्यानंतर ६५ वर्षांनी केवळ ८० वर्षांच्या पुढील व्यक्तींना सिगारेट खरेदी करता येऊ शकेल. वास्तवात, सिगारेट ओढण्याची नागरिकांची सवय त्याआधीच अनेक वर्षे बंद होईल, असा सरकारला विश्‍वास आहे. हा कायदा पुढील वर्षी मंजूर होण्याची शक्यता आहे. २०२५ पर्यंत सिगारेटचे व्यसन असलेले पाच टक्क्यांहून कमीच लोक असतील, असे लक्ष्यही सरकारने ठेवले आहे.

हेही वाचा: दोन लग्नं, तिसरी जोडीदार; ब्रिटनचे पंतप्रधान आठव्यांदा झाले बाबा

तंबाखूमुळे आरोग्याचे नुकसान झालेले अनेक जण भेटतात. अनेक लोकांचा यामध्ये भयावह पद्धतीने अंतही होतो. त्यामुळेच आम्ही तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यावर भर देतो. गेल्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांमुळे न्यूझीलंडमध्ये फक्त ११ टक्के प्रौढ नागरिक धुम्रपान करतात.

- डॉ. आयेशा व्हेराल, सहाय्यक आरोग्य मंत्री, न्यूझीलंड

Web Title: Cigarettes Or Tobacco Products Will Never Be Used In New Zealand

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..