

Chief Justice of India Surya Kant addressing the Policy Dialogue on Climate Justice at the Commonwealth Secretariat in London.
esakal
“तुम्हाला स्वच्छ ऊर्जेकडे वळण्यासाठी जवळपास २०० वर्षे लागली, मग आम्हाला काही दशकांतच बदल करण्याची घाई का?” असा सवाल करत भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी विकसित देशांच्या अपेक्षांवर स्पष्ट शब्दांत भाष्य केले. विकसित देशांनी स्वतः कोळसा आणि तेलावर आधारित ऊर्जा व अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी दोन शतके घेतली असताना, औद्योगिकीकरणाच्या प्रक्रियेत असलेल्या विकसनशील देशांकडून मात्र काही दशकांतच नवीकरणीय ऊर्जेकडे संक्रमणाची अपेक्षा केली जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.