
पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये गेल्या 24 तासांत लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 18 जवान आणि 23 दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे. इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सनुसार, शुक्रवारी हरनाई जिल्ह्यात अकरा दहशतवादी मारले गेले. तर कलात जिल्ह्यात रात्रभर झालेल्या सुरुवातीच्या चकमकीत 12 जण ठार झाले.