मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक अॅलन यांचे निधन

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

न्यूयॉर्क : मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल अॅलन (वय 65) यांचे सोमवारी (ता. 15) निधन झाले आहे. गेले काही वर्ष अॅलन हे कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांनी आपले बालपणीचे मित्र व सहकारी बिल गेट्स यांच्यासह मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती. 

पॉल अॅलन यांची कंपनी व्हल्कन इंकने याबाबत माहिती प्रसिद्ध केली आहे. अॅलन यांना 2009 पासून कर्करोगाने ग्रासले होते. गेल्या काही दिवसात कर्करोगाने पुन्हा डोके वर काढले होते, अशी माहिती त्यांनी काही दिवसांपूर्वीच दिली होती. 

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक असलेले अॅलन हे पोर्टलँड ट्रेल ब्लेजर्स आणि सिएटल सिहॉक्स या कंपन्यांचे प्रमुख होते. 1975 साली गेट्स व अॅलन यांनी एकत्र येऊन मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती. मायक्रोसॉफ्टच्या यशस्वीतेनंतर त्यांनी अनेक समाजसेवी संस्थांद्वारे समाजसेवी कामे केली.   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: co founder of Microsoft Alen Poll passed away

टॅग्स