esakal | कोहेन यांना पैसे दिल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खुलासा 
sakal

बोलून बातमी शोधा

donald trump

आपले खासगी वकील मायकल कोहेन यांना निवडणुकीसंदर्भातील खर्चापोटी अडीच लाख डॉलर दिल्याचा खुलासा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केला. यातील 1 लाख 30 हजार डॉलर पोर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्स हिला देण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. 

कोहेन यांना पैसे दिल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खुलासा 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

वॉशिंग्टन -  आपले खासगी वकील मायकल कोहेन यांना निवडणुकीसंदर्भातील खर्चापोटी अडीच लाख डॉलर दिल्याचा खुलासा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केला. यातील 1 लाख 30 हजार डॉलर पोर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्स हिला देण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. 

ट्रम्प यांनी आपल्या आर्थिक तपशिलाची माहिती मंगळवारी ऑफिस ऑफ गव्हर्नमेंट इथिक्‍सकडे (ओजीइ) सादर केली. "ओजीइ'ने सदर फॉर्मची पडताळणी केल्यानंतर तो सार्वजनिक केला असून, त्याद्वारे ही माहिती उघड झाली. ही रक्कम नेमकी कशावर खर्च करण्यात आली, याचा उलगडा झाला नसून, अध्यक्षपदाच्या निवडणुकी वेळी ट्रम्प यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा गौप्यस्फोट स्टॉर्मी हिने केला होता. तिचे तोंड बंद ठेवण्यासाठी सदरची रक्कम अदा करण्यात आल्याचे समजते. 

दरम्यान, कोहेन आणि ट्रम्प यांनी यापूर्वीच स्टॉर्मीला पैसे दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, याप्रकरणी एफबीआयकडून तपास सुरू आहे. एबीआयने गेल्या महिन्यात कोहेन यांच्या निवासस्थानी छापा टाकून काही महत्त्वाची कागदपत्रेही जप्त केली आहेत. 

loading image