

Colombia Plane Crash
Esakal
Colombia Plane Crash: कोलंबियात भीषण विमान दुर्घटनेत एका खासदारासह १५ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. कुकुटा येथून कोलंबियातील ओकाना येथे जाणारे एक व्यावसायिक बीचक्राफ्ट १९०० विमान बेपत्ता झाले. विमानाचा शेवटचा संपर्क लँडिंगच्या काही मिनिटांपूर्वी नोंदवण्यात आला होता. त्यानंतर कॅटाटुम्बो प्रदेशात शोध मोहीम सुरू करण्यात आली, जिथे अवशेष सापडले.