कोलंबो बॉम्बस्फोट प्रकरणाचे पाकिस्तान कनेक्शन

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 एप्रिल 2019

- श्रीलंका पोलिसांनी 9 पाकिस्तानी नागरिकांना केली अटक
- देशातल्या विविध भागातून या लोकांना करण्यात आली अटक
- याच लोकांनी दहशतवाद्यांना मदत केल्याचा पोलिसांचा संशय
- साहित्य आणि पैसा पुरविल्याची शक्यता

कोलंबो : श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटांबद्दल दररोज नव नवे खुलासे होत आहेत. या प्रकरणात श्रीलंका पोलिसांनी 9 पाकिस्तानी नागरिकांना अटक केलीय. देशातल्या विविध भागातून या लोकांना अटक करण्यात आली आहे. याच लोकांनी दहशतवाद्यांना मदत केल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यांनी साहित्य आणि पैसा पुरविल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व लोकांची वेगवेगळी चौकशी करण्यात येत आहे.

श्रीलंकेचे मंत्री लक्ष्मण किरियेल्ला यांनी आपल्याच सुरक्षा संस्थांवर आरोप केले आहेत. भारताने घातपाताची शक्यता असल्याची सूचना दिली होती मात्र गुप्तचर संस्थांनी त्यावर कारवाई केली नाही असंही ते म्हणाले. या स्फोटाचा तपास एक खास टीम करत असून त्यात अनेक धक्कादाक गोष्टी बाहेर येत आहेत. याच खास पथकाने ही अटकेची कारवाई केली.

दरम्यान, रविवारी ईस्टरच्या दिवशी श्रीलंकेत झालेल्या विविध आठ आत्मघातकी बॉम्ब स्फोटांमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या 400 वर पोहोचली आहे. त्यात 34 विदेशी नागरिक होते. तर 500 जणहून अधिकजण जखमी झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Colombo bomb blasts have connections in Pakistan