
सहाय्यक वैद्यकीय आत्महत्येला मान्यता देणारा कोलंबिया ठरला पहिला लॅटिन अमेरिकन देश
बोगोटा : डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णांसाठी सहाय्यक वैद्यकीय आत्महत्या (Assisted Medical Suicide) अधिकृत करणारा कोलंबिया (Columbia) हा पहिला लॅटिन अमेरिकन देश बनला आहे. या निर्णयानंतर कोलंबियामध्ये गंभीर आजाराचा सामना करणारे रुग्ण आता आत्महत्येसाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मदत घेऊ शकणार आहेत. याबाबत कोलंबियाच्या घटनात्मक न्यायालयाने गुरुवारी निर्णय जाहीर केला आहे. कोलंबियामध्ये इच्छामरणाला (Euthanasia) यापूर्वी परवानगी असून, हा कायदा 1997 पासून लागू आहे. (Columbia Permitted Assisted Medical Suicide )
हेही वाचा: खलिस्तानी दहशवादी रिंदासाठी भारतात काम करतात 27 स्लिपर सेल; IB चा खुलासा
डॉक्टर तुरुंगात जाण्याचा धोका न घेता गंभीर आजारी असलेल्या रुग्णाला प्राणघातक औषध देऊन त्याला आत्महत्या करण्यास मदत करू शकतात, असे कोलंबियाच्या सर्वोच्च न्यायालयाचे म्हटले आहे. शारीरिक दुखापतीमुळे किंवा गंभीर आणि असाध्य रोगामुळे उद्भवलेल्या तीव्र शारीरिक किंवा मानसिक वेदना सहन करणाऱ्या व्यक्तींनाच सहाय्यक आत्महत्येस परवानगी दिली जाईल असेदेखील न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे.
हेही वाचा: एकाच कुटुंबातील ११ जणांना हवे इच्छामरण; राष्ट्रपतींना लिहिले पत्र
कोलंबियामध्ये इच्छामरणाला आधीच परवानगी असून, 1997 पासून येथे हा कायदा लागू आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, 1997 पासून कोलंबियामध्ये 200 पेक्षा कमी लोकांनी इच्छामरणाचा पर्याय निवडला आहे. इच्छामरणाला अपराधमुक्त ठरवूनही जर एखाद्या डॉक्टरने एखाद्या व्यक्तीचे जीवन संपवण्यास मदत केल्यास डॉक्टरला १२ ते ३६ महिन्यांच्या तुरुंगवास भोगावा लागण्याचा धोका पत्करत आहे.
इच्छामरण आणि सहाय्यक आत्महत्या यात फरक काय?
राईट टू डाय विथ डिग्निटी फाउंडेशननुसार (DMD) इच्छामरण आणि सहाय्यक आत्महत्या यातील फरक मूळतः औषधं कोण देतं याच्याशी जोडलेला आहे. इच्छामरणात आरोग्य कर्मचाऱ्याकडून औषधं दिलं जातं, ज्यामुळे मृत्यू होतो. तर, दुसरीकडे सहाय्यक आत्महत्येमध्ये रुग्ण स्वत: च औषधं घेतो, जी इतर व्यक्तीद्वारे देण्यात आलेली असतात.
Web Title: Columbia Right To Assisted Medical Suicide Know How Euthanasia Is Different
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..