खलिस्तानी दहशवादी रिंदासाठी भारतात काम करतात 27 स्लिपर सेल; IB चा खुलासा | Terrorist | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा

खलिस्तानी दहशवादी रिंदासाठी भारतात काम करतात 27 स्लिपर सेल; IB चा खुलासा

नवी दिल्ली : भारताचा मोस्ट वाँटेड खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग रिंदाबाबत (Harvindar Singh Rinda) गुप्तचर विभागाचा (IB) मोठा खुलासा केला आहे. रिंदा त्याची ओळख लपवण्यासाठी नेहमी वेशांतर करत असतो. एवढेच नव्हे तर, त्याने आतापर्यंत 6 वेळा वेगवेगळ्या प्रकारे वेशांतर केले आहे, अशी माहिती एजन्सीच्या तपासात समोर आले आहे. रिंदासाठी भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी 27 स्लिपर सेल (Sleeper Cells) काम करतात, असादेखील खूलाला करण्यात आला आहे. (Harvindar Singh Rinda News)

हेही वाचा: नांदेडमध्ये हत्या ते दहशतवादी कारवाया; रिंदा प्रकरणाचा तपास ATSकडे

रिंदा याने 2020 मध्ये पाकिस्तानी एजन्सी ISI च्या मदतीने भारतातून पळ काढला होता. तेव्हापासून तो स्लीपर सेलच्या मदतीने पंजाब, हरियाणा, हैदराबाद आणि महाराष्ट्रात स्फोटकांचा पुरवठा करत असल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, एजन्सींनी त्याला A+ स्तरावरील गुंड म्हणून घोषित केले आहे.

हेही वाचा: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : शाळांमध्ये सुरू होणार Youth Tourism क्लब

हरविंदर सिंग रिंदा याच्यावर आतापर्यंत 37 गुन्हे दाखल असून, त्यापैकी नांदेडमध्ये 14 आणि पंजाबमध्ये 23 गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आतापर्यंत त्याच्या 15 साथीदारांना अटक केली आहे. रिंदावर मोक्का, अपहरण आणि खूनाचे गुन्ह्यांसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. सर्वात धक्कादायकबाब म्हणजे रिंदाने त्याच्या खटल्याशी संबंधित महत्त्वाच्या साक्षीदारांचीही हत्या केली आहे.

रिंदासाठी भारतात करतात 27 गुंड काम

गुप्तचर यंत्रणांनी केलेल्या तापसामध्ये खलिस्तानी दहशतवादी रिंदासाठी भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी 27 गुंड काम करतात, अशीदेखील माहिती आतापर्यंतच्या तपासात समोर आली आहे. त्यापैकी एकाचे नाव गुरप्रीत असून त्याला नुकतेच पंजाबमधील करनाल येथील कारवाईदरम्यान अटक करण्यात आली आहे.

Web Title: 27 Sleepers Cells Work For Khalistani Terrorist In India Says Intelligence Bureau Of India

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top