तालिबानी राजवटीत जनतेचे मरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

taliban

तालिबानी राजवटीत जनतेचे मरण

काबूल : अफगाणिस्तानची सत्ता तालिबानने स्वतःच्या हाती घेतली असली तरीसुद्धा आता त्यांच्यासमोर मोठी आर्थिक आणि लष्करी आव्हाने उभी ठाकली आहेत. देशातील काही भागांतून त्यांच्या राजवटीला सशस्त्र विरोध होऊ लागला असून हा लढा आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दुसरीकडे तालिबानी राजवटीत सामान्य जनतेचे मात्र होरपळ होताना दिसते.

देशभरातील एटीएममध्ये खडखडाट निर्माण झाला असून लाखो लोकांसमोर अन्नाचे संकट उभे ठाकले आहे. जीवनावश्‍यक वस्तूंच्या किमती देखील वाढल्या आहेत. पंजशीर खोऱ्यातून तालिबान्यांच्या राजवटीला सशस्त्र विरोध होऊ लागला आहे. तालिबानने शरिया कायदा लागू करण्याची घोषणा केली असली तरीसुद्धा सामान्य नागरिकांचा मात्र त्याला मोठा विरोध दिसतो.

हेही वाचा: एका नागरिकाला घेऊन विमान रोमानियाला परतले

एक मोठा मानवी संघर्ष आपल्या डोळ्यासमोर होताना दिसतो आहे, असे अफगाणिस्तानातील जागतिक अन्न कार्यक्रमाच्या प्रमुख मेरी मॅकग्रोटरी यांनी सांगितले. तालिबान्यांनी आज नाइलाजाने देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला खरा पण अनेक ठिकाणांवर सशस्त्र उठाव होऊ लागल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे.

आर्थिक कोंडी :

अफगाणिस्तानचा अमेरिकी बँकेतील तब्बल ९ अब्ज डॉलरचा निधी गोठविण्यात आला असून देशाच्या मध्यवर्ती बँकेला होणारा डॉलरचा पुरवठा ठप्प झाला आहे. देशात अभूतपूर्व असा दुष्काळ पडला असून ४० टक्के पिके हातची गेल्याचे जाणकार सांगतात. व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून करभरणा आणि किमतींबाबत त्यांच्या मनात कमालीचा संभ्रम असल्याचे दिसून येते.

Web Title: Commodity Prices Rise In Afghanistan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Afghanistantaliban